45 व्या वर्षात पाचव्यांदा ‘बाप’ झालेला आफ्रिदी म्हणतो…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, वीर पुत्र अभिनंदन यांच्यावर विधान करणारा पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीकडे पाहून वाटत आहे की, तो पाकिस्तानमध्ये नेता म्हणून स्वतःची भूमिका तयार करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळेच मागील काही दिवस भारताविरूद्ध वक्तव्ये करत आहे. मात्र असे नाही कि आफ्रिदी केवळ वक्तव्ये करतो आणि भारताविरुद्ध द्वेष निर्माण करत राहतो. त्याच्याकडे आणखी काही मुद्दे आहेत. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत त्याने मुलींविषयी समाजाची विचारसरणी बदलण्याबाबत सांगितले.

अलीकडे एका मुलाखतीत आफ्रिदीने म्हटले की, निरोगी मुले दिल्याबद्दल अल्लाहचे आभार मानणे पुरेसे नाही. पुढे म्हणाला की, आजकाल मुले ज्या प्रकारे बिघडत आहेत, अशात फक्त मुलीच आहेत ज्या त्यांच्या वडिलांसह असतात. तुम्ही मुलींना शिकवले पाहिजे, तर तुम्हाला मुलाची कमी जाणवणार नाही.

४५ वर्षीय शाहिद आफ्रिदी यावर्षी फेब्रुवारी महिन्यात पाचव्यांदा मुलीचा वडील झाला होता. सोशल मीडियावर याविषयी माहिती देताना त्याने म्हटले होते की, देवाची दया त्याच्यावर कायम आहे. त्याला आधीच चार मुली आहेत आणि आणखी एक आल्याने पाच झाल्या आहेत.

शाहिद आफ्रिदीचे विधान
शाहिद आफ्रिदीने एका टीव्ही चॅनेलवर थेट संवाद साधत असताना म्हटले की, ‘पाकिस्तानचे सैन्य नेहमीच सकारात्मक बोलत असते, यापेक्षा चांगले उदाहरण काय असू शकते. आपले जे आलेले भाऊ अभिनंदन, त्यांना आपण चहा देऊन आदरपूर्वक परत पाठवले. हिंदुस्थानने त्याला तिथे हिरो बनवले, ज्याला आपण परत पाठवले.’ आफ्रिदी पुढे म्हणाला, ‘आम्ही तुमच्यासाठी यापेक्षा आणखी काय करू शकतो? मला म्हणायचे आहे कि भारतानेही एक-दोन पाऊल पुढे टाकली पाहिजेत. तुम्हीही माणूस आहात त्याच्याच आधारावर काम केले पाहिजे.’