प्रदुषणाच्या प्रश्नावर पुन्हा ‘राजकारण’ ! केजरीवालांना डेन्मार्कला जाण्यास केंद्राने परवानगी नाकारली

नवी दिल्ली : वृत्त संस्था – गेल्या काही वर्षात हिवाळ्यात दिल्लीतील प्रदुषणाचा मुद्दा नेहमीच गाजत असतो. दिल्लीतील प्रदुषण कमी करण्यास कसे यश आले, यावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजलीवाल हे सी ४० जलवायू संमेलनात भाषण देणार होते. पण, त्यात राजकारण आणून केंद्र सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाने त्यांच्या डेन्मार्क दौऱ्याला अजूनपर्यंत परवानगीच दिली नाही. त्यामुळे आता केजरीवाल डेन्मार्कला जाऊ शकणार नाहीत.

हिवाळ्यात पंजाब, हरियाना येथील शेतकरी गव्हाची काढणी झाल्यानंतर पालापाचोळा शेतात जाळतात, त्यामुळे हवेमुळे तो धुर दिल्लीत येतो. त्यातून दिल्लीत मोठ्या प्रमाणावर प्रदुषण होते. याशिवाय वाढत्या वाहनसंख्येमुळे दिल्लीत प्रदुषण वाढत जात होते. यावर दिल्ली सरकारने काय उपाय योजना केल्याची याची माहिती केजरीवाल हे जगाच्या व्यासपीठावर देणार होते.

डेन्मार्क येथे सी ४० जलवायू संमेलन ९ ते १२ ऑक्टोंबर दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनासाठी आज मंगळवारी दुपारी २ वाजता कोपनहेगनला  मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे रवाना होणार होते. परंतु, त्यांच्या दौऱ्याला केंद्र सरकारने अजून परवानगीच दिलेली नाही. त्यामुळे आता ते जाण्याची शक्यता कमी आहे.

आठ सदस्य असलेल्या प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व केजरीवाल करणार होते. केजरीवाल यांना परवानगी न देता केंद्र सरकारने पश्चिम बंगाल सरकारचे शहरी विकासमंत्री फरहाद हाकिम यांना मात्र याच संमेलनाला जाण्यास परवानगी दिली आहे.

Visit  :Policenama.com