ताजमहलचा ‘तो’ View पाहण्यासाठी आता चांदणीची वाट पहावी लागणार नाही, दररोज रात्री 20 रूपयात ‘इथं’ पाहा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगातील सात आश्चर्यांपैकी एक असलेल्या ताजमहलाचे दर्शन आजपासून पुन्हा सुरु झाले आहे. मेहताब बाग पासून ताजमहलचे हे दर्शन सुरु झाले असून पर्यटक केवळ 20 रुपयांमध्ये सकाळी सातपासून ते रात्री नऊ वाजेपर्यंत ताजमहलचे दर्शन घेऊ शकतात. तर पौर्णिमेच्या दिवशी रात्री बारा वाजेपर्यंत हे दर्शन उघडे असणार आहेत. विशेष म्हणजे विदेशी पर्यटकांना देखील भारतीय नागरिकांप्रमाणेच तिकीटदर ठेवण्यात आला आहे.

ताज नाइट व्यूपॉईंट तयार
पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी यमुना नदीच्या पलीकडे असणाऱ्या मेहताब बाग आणि यमुना नदीच्या मध्ये ताज नाइट व्यूपॉईंट तयार करण्यात आला आहे. यासाठी खास लाल दगडांचे व्यासपीठ तयार करण्यात आले आहे.

दररोज तीन तास या ठिकाणाहून दर्शन
आगरा विकास प्राधिकरण द्वारा विकसित करण्यात आलेल्या या जागेवरून दररोज पर्यटक तीन तास ताजमहलचे दर्शन घेऊ शकणार आहेत. तसेच पौर्णिमेच्या दिवशी रात्री बारा वाजेपर्यंत हे ठिकाण उघडे राहणार आहे.

ताजमहालपासून 300 मीटर दूर
या जागेची लांबी हि ताजमहालपासून 300 मीटर दूर असून या ठिकाणाहून ताजमहलचे दर्शन घेण्यासाठी देशी पर्यटकांना 510 रुपये तर विदेशी पर्यटकांना 750 रुपये तिकीट ठेवण्यात आले आहे. तर ताज नाइट व्यू पॉईंट पासून दर्शन घेण्यासाठी तुम्हाला केवळ 20 रुपये मोजावे लागणार आहेत.

Visit : Policenama.com