अजित पवारांनी फसवणूक केली, शरद पवारांनी सांगितलं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आज राज्याच्या राजकीय घडमोडी अशा घडल्या की सत्तास्थापनेचे सर्वच फासे पलटले. आज सकाळी राजभवनावर जाऊन भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे आमदार आणि प्रमुख नेते अजित पवार यांनी सत्तास्थापन केली आणि राज्यातील सर्वांना मोठा धक्का दिला.

राजभवनावर जाऊन फडणवीसांनी मुख्यमंत्री आणि अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर आज शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली. या दरम्यान अजित पवारांवरील कारवाईचा निर्णय बैठकीत घेण्यात येईल. अजित पवार यांच्याबाबत निर्णय निश्चित घ्यावा लागेल आणि घेतला जाईल असे शरद पवारांनी सांगितले.

शरद पवार म्हणाले की अजित पवार गेले याचं मला काही वाटत नाही, असा फुटीचा अनुभव मी घेता आहे. या फुटीतून मी गेलो आहे, ते गेल्याचा काहीही परिणाम होणार नाही. 1980 साली मला फुटीचा अनुभव आला, त्यानंतर आम्हाला सोडून जाणाऱ्या सर्वांचा मी पराभव केला आहे. फक्त असं कधी वाटलं नव्हतं की अजित पवार फुटून जातील.

सत्तास्थापनेचा दावा आम्ही करणार असे सांगताना पवार म्हणाले की, आम्ही सरकार बनवणार, बनवू शकतो आणि आवश्यक संख्याबळ आमच्याकडे आहे. अजित पवार ईडीच्या चौकशीमुळे गेले की काय हे मला माहिती नाही. परंतू योग्य त्या कारवाईचा निर्णय बैठकीत घेऊ.

राजभवनात सत्तास्थापनेचा भाजपकडून कसा दावा करण्यात आला यावर बोलताना पवारांनी खुलासा केला, ते म्हणाले याद्या तयार करुन आमदारांच्या सह्या घेऊन ठेवल्या होत्या. त्या याद्या अजित पवारांनी कार्यालयातून ताब्यात घेतल्या असतील. याच याद्या अजित पवारांनी राज्यपालांसमोर सादर केल्या असतील. हा फसवणूक करण्याचा प्रकार आहे. भाजपला बहुमत स्पष्ट करता येणार नाही.

Visit : Policenama.com