Ajit Pawar | ‘अंगाशी आलं की काही लोक…’, हनी ट्रॅप प्रकरणावरुन अजित पवारांचा भाजपला टोला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – हनी ट्रॅप प्रकरणात (Honey Trap Case) अटक करण्यात आलेले डीआरडीओचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ (DRDO Senior Scientist) डॉ. प्रदीप कुरुलकर (Dr. Pradeep Kurulkar) यांनी मोहजालात अडकडून देशाची महत्त्वाची माहिती पाकिस्तानला (Pakistan) दिली. त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा (Crime of Treason) दाखल केला पाहिजे. तसेच जलदगती न्यायालयात हा खटला चालवावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी केली. तसेच अंगाशी आलं की काही लोक जाणीवपूर्वक गप्प बसत्ता, असा टोला अजित पवारांनी (Ajit Pawar) भाजपचे (BJP) नाव न घेता लगावला.

शुक्रवारी पुण्यात जिल्हा नियोजन समितीची बैठक (District Planning Committee Meeting) पार पडली. या बैठकीला अजित पवार (Ajit Pawar) आले होते. त्यावेळी त्यांना कुरुलकर प्रकरणात सत्ताधारी काहीच बोलत नाही, यावर विचारले असता ते म्हणाले, कुरुलकर यांनी जे काही केले तो देशद्रोह आहे. त्याबाबतचे सर्व पुरावे समोर आले आहे. अशा व्यक्तींवर मोठी कारवाई झाली पाहिजे. त्याकरिता त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा. तसेच हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवले गेले पाहिजे. जेणेकरून देशाशी गद्दारी करणाऱ्यांना कोणत्याही स्वरूपात माफ केले जाणार नाही, हा संदेश गेला पाहिजे.

 

अजित पवार पुढे म्हणाले, कुरुलकर कोणाशी संबंधित होते,
याची माहिती पत्रकारांनी आणि जनतेने खोलवर जाऊ घेतली पाहिजे, असे सूचक वक्तव्य त्यांनी केले.
अंगाशी आले की काही लोक जाणीवपूर्वक गप्प बसतात, असा टोला भाजपला नाव न घेता लगावला.

 

Web Title :  ajit pawar comment on drdo scientist pradeep kurulkar who arrested in honey trap case

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा