Ajit Pawar On Sharad Pawar | अजित पवारांचे शरद पवारांना प्रत्युत्तर, ”मी जर कोणाला धमकावले असते तर…”

बारामती : Ajit Pawar On Sharad Pawar | बारामती लोकसभा मतदार संघातील (Baramati Lok Sabha Election 2024) पवार विरूद्ध पवार सामना आता जोरदार रंगला आहे. आरोप-प्रत्यारोप, भावनिक आवाहन दोन्ही बाजूकडून सुरू आहे. काल सुपे येथे बोलताना शरद पवार यांनी अजित पवार यांचे नाव न घेता आरोप केला होता. या आरोपाला आज अजित पवार यांनी बारामती येथे आले असताना प्रत्युत्तर दिले. गुढीपाडव्यानिमित्त भेटीगाठी घेण्यासाठी ते आले होते.

सुपे येथे शरद पवार यांनी दमबाजीला घाबरु नका असे जाहीर सभेत म्हटले होते. यावर अजित पवार म्हणाले, पाणी देण्यासाठी मी जर कोणाला धमकावले असते तर जनतेने मला इतक्या मोठ्या प्रमाणावर पाठिंबा दिलाच नसता. संस्था चालविताना संस्थेच्या पद्धतीने चालवायची असते आणि राजकारण हे राजकारणाच्याच पद्धतीने करायचे असते. जर कोणी धमकावलेच असेल तर पोलिसांत तक्रार दाखल करावी, पोलीस त्या बाबतची कार्यवाही करतील.

विजय शिवतारे यांच्याबाबत प्रतिक्रिया देताना अजित पवार म्हणाले, शिवतारे यांच्या मागण्यांबाबत त्यांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या समोर काही भूमिका मांडली होती. त्याच वेळेस त्यांच्या भागात त्यांच्या कार्यकत्र्यांचा एक मेळावा घेण्याची इच्छा त्यांनी प्रदर्शित केली होती. त्यानुसार ११ एप्रिल रोजी होणाऱ्या त्यांच्या मेळाव्यास उपस्थित राहणार आहे.

तर लोकसभेची लढाई नरेंद्र मोदी विरुद्ध उद्धव ठाकरे आहे,
या संजय राऊत यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना अजित पवार म्हणाले,
तुम्हाला तरी खरंच असं वाटतं का? एक वेळ नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी ही लढाई आहे,
असे ते म्हणाले असते तर ते मान्य करता आले असते. पण, त्यांचा पक्ष महाराष्ट्राबाहेर नाही.
त्यामुळे असे होणार नाही. लोकांना पटेल असे तरी त्यांनी बोलावे, असे अजित पवार म्हणाले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | पुणे : पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या अभिलाषा मित्तलने उचललं टोकाचं पाऊल, हत्या कि आत्महत्या?

Mahavitran’s EV Charging Station In Pune | महावितरणचे विद्युत वाहन चार्जिंग स्टेशन आता सौर ऊर्जेवर ! पुण्यातील सौर प्रकल्पाची संचालक प्रसाद रेशमे यांच्याकडून पाहणी

Pune Mahavitaran News | महापारेषणच्या लोणीकंद उपकेंद्रात बिघाड; चाकण एमआयडीसी पसिरात वीज खंडित