पार्थ पवार यांना मावळमध्ये उमेदवारी देण्यामागचं ‘हे’ आहे अजित पवारांचं ‘गणित’

मावळ : पोलीसनामा ऑनलाईन – यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मावळ मतदार संघ चांगलाच चर्चेत आहे. राष्ट्रवादीच्या हक्काच्या मानल्या जाणाऱ्या या मतदार संघात यंदा राष्ट्रवादी पक्षाकडून माजी उप मुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना उमेदवारी देण्यात आली. त्यांच्या विरोधात शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

खुद्द राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी माघार घेऊन नातू पार्थ पवार यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे पार्थ यांना दिलेली उमेदवारी चांगलीच चर्चेचा विषय बनली आहे. यावेळी तरुण उमेदवाराला संधी देत आहोत असे म्हणून शरद पवारांनी पार्थ पवार यांची उमेदवारी जाहीर केली होती.

तसे पाहायला गेले तर पार्थ पवार यांना मोठा राजकीय वारसा असला तरी पहिल्यांदाच ते राजकीय क्षेत्रात आपले नशीब आजमावायला जात आहेत. त्यांनी केलेल्या पहिल्या वहिल्या भाषणाची जोरदार चर्चा झाली होती. सोशल मीडियावर त्यांच्या भाषणाबाबत उलट सुलट चर्चा रंगल्या होत्या. एकीकडे खासदार असलेल्या बराणेंविरोधात नवख्या पार्थ यांना का उमेदवारी देण्यात आली ? एवढी मोठी रिस्क अजित पवार यांनी का घेतली ? असा प्रश्न साहजिकच सर्वसामान्य नागरिकाला पडले असतील. तर त्याच्यामागे नक्की कोणते कारण आहे. याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

पार्थ पवार यांना उमेदवारी देण्यामागचं काय आहे अजितपवारांचं गणित

  • मावळ मतदार संघातून राष्ट्रवादीकडे कोणताही तुल्यबळ स्थानिक उमेदवार नाही.
  • या मतदारसंघात असलेल्या पिंपरी-चिंचवडसह मोठ्या भागात अजित पवार यांना मानणारे कार्यकर्ते आहेत.
  • उमेदवाराची असलेली कमतरता आणि त्यातच अजित पवार यांचे पुत्र म्हणून पार्थ पवार यांच्यामागे उभे राहणारी कार्यकर्त्यांची ताकद.

या कारणांमुळे अजित पवारांनी मावळ मतदार संघातून पार्थ यांना उमेदवारी देण्यात आल्या असल्याची चर्चा आहेत.