Ambadas Danve On Eknath Shinde | शिंदेंनी शिवसेना दिल्लीच्या दारात नेऊन ठेवली, आता अजितदादांच्या…, अंबादास दानवेंची मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका

मुंबई : Ambadas Danve On Eknath Shinde | एकनाथ शिंदे (Eknath Shinde) भाजपसोबत (BJP) गेले तेव्हा त्यांनी खूप आरोप केले. शिंदे यांनी म्हणाले होते अजित पवार (Ajit Pawar) निधी देत नाहीत. विकास रोखतात. आता अजितदादाच्या मांडीला मांडी लावून बसत आहेत. शिवसेना दिल्लीच्या दारात नेऊन ठेवली, अशी टीका विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते आणि शिवसेना ठाकरे गटाचे (Shivsena UBT) नेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली आहे.

तर अभिनेता गोविंदाच्या शिवसेना शिंदे गटातील प्रवेशावर अंबादास दानवे म्हणाले, गोविंदा (Govinda) यांच्याबद्दल मला काही बोलायचे नाही. राम नाईक आदरणीय आहेत. त्यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिलेय की त्याने दाऊदचे पैसे घेऊन निवडणूक लढवली. हे आम्ही नाही नाईक म्हणाले होते. गोविंदा यांचा जमाना गेला, आता रणवीर सिंहचा जमाना आहे, असे दानवे म्हणाले.

तसेच वंचितसोबतच्या आघाडीबाबत दानवे म्हणाले, प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी आजही महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) यावे. ते संवेदनशील नेते आहेत. भाजप देशात घटनेची पायमल्ली करत असताना सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे.

चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांच्यासोबतच्या नाराजीबाबत अंबादास दानवे म्हणाले,
आमच्यात कुठलाही वाद नव्हता. यापुढेही आमच्यात वाद असणार नाही.
आम्ही एक दिलाने काम करून विरोधकाला पराभूत करणार आहोत.
या निवडणुकीत आमचा विजय शंभर टक्के होणार आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime Court News | WhatsApp द्वारे हॉटेलमध्ये चालवल्या जाणाऱ्या बालेवाडी येथील हायप्रोफाईल सेक्स रॅकेट मधील आरोपीला न्यायालयाकडून जामीन मंजूर

Supriya Sule On BJP | सुप्रिया सुळेंचा भाजपावर गंभीर आरोप, भाजपाने आमचे घर फोडले, मोठ्या भावाची बायको आईसारखी…

Chhagan Bhujbal | छगन भुजबळ नाशिकमधून लोकसभा लढवणार?

Maharashtra Sadan Scam | महायुतीला धक्का! अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ अडचणीत? उद्यापासून सुरू होणार ‘या’ प्रकरणाची सुनावणी