Amit Shah | 26 नोव्हेंबरला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पुण्यात; मात्र, शरद पवारांचे निमंत्रण नाकारले?

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Amit Shah | केंद्रीय गृहमंत्री व सहकार मंत्री अमित शाह (Amit Shah) 26 नोव्हेंबर रोजी पुणे (Pune) दौऱ्यावर आहेत. शाह यांच्या उपस्थिमध्ये गणेश क्रिडा कला मंच, स्वारगेट येथे पुणे शहर भाजप (BJP) कार्यकर्ता मेळावा आयोजित केला जाणार आहे. या आयोजित मेळाव्यात माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) उपस्थित राहणार आहेत.

 

‘या मेळाव्याच्या तयारीसाठी भाजप पदाधिकाऱ्यांची बैठकही घेण्यात आली. 18 नोव्हेंबरपासून पुढील 4 दिवस मंडलनिहाय बैठकांचे आयोजन करण्यात आलेय. या बैठकांमध्ये स्थानिक आमदार, मंडल अध्यक्ष, शहर पदाधिकारी आणि नगरसेवक मार्गदर्शन करतील. त्यानंतर 4 दिवसांत मंडलनिहाय पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते, शक्ती केंद्रप्रमुख, बूथप्रमुख आणि बूथ समिती सदस्यांच्या बैठका होणार आहेत.

दरम्यान, राष्ट्रवादी काॅग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांना पुणे भेटीचे निमंत्रण दिले होते. या निमंत्रणावरून अमित शाह पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटला भेट देणार होते. पण, शाह यांच्या दौऱ्यामध्ये इन्स्टिट्यूटला भेट देण्याचा उल्लेख नसल्याचं एका वृत्तावाहिनीकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, अमित शाह यांनी निमंत्रण नाकारले असल्याचे समोर येत आहे. त्यामुळं केंद्रीय गृहमंत्री अन् सहकार मंत्री हे आता व्हीएसआयला भेट देणार की नाही याबाबत चर्चा सुरू झाली आहे.

 

Web Title :- Amit Shah | union home minister amit shah visit pune november 26 ncp leader sharad pawar turned down invitation

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

आता truecaller वरून कुणीही शोधू शकणार नाही तुमचा नंबर, तुम्हाला करावे लागेल केवळ ‘हे’ काम; जाणून घ्या

Supreme Court on Parambir Singh | मुंबईच्या माजी पोलिस आयुक्तांना अटकेपासून दिलासा देण्यास SC कडून स्पष्ट नकार; म्हणाले – ‘कुठं आहेत परमबीर सिंग’

EPFO-LIC | एलआयसीचा प्रीमियम भरण्यासाठी येत असेल आर्थिक अडचण तर EPFO अ‍ॅडव्हान्समधून भरू शकता रक्कम, जाणून घ्या कसा करावा अर्ज

Anil Deshmukh | सर्वोच्च न्यायालयानं अनिल देशमुखांची तपासाबाबत ‘ती’ मागणी करणारी याचिका फेटाळली; माजी गृहमंत्र्यांच्या अडचणीत वाढ?

Monalisa In Blue Bikini | निळ्या रंगाच्या बिकनीमध्ये मोनालीसाचा ‘हाॅट’ आणि सेक्सी अंदाज; फोटो झाले व्हायरल

Shirdi Saibaba Sansthan | शिर्डी संस्थानाच्या बाबतचा ‘तो’ निर्णय लांबणीवर; मुख्यमंत्र्यांच्या तब्यतीचे दिले कारण

Sapna Chaudhary | अभिनेत्री सपना चौधरी विरुद्ध अटक वाॅरंट; ‘या’ प्रकरणात गुंतलीय देशी क्वीन