श्री महावीर विद्यालय लासलगाव येथे वार्षिक पारितोषिक वितरण उत्साहात संपन्न

लासलगाव : पोलीसनामा ऑनलाइन – विद्यार्थ्यांनी खेळ, मनोरंजन आणि अंगभूत कलेला वाव देतांना अभ्यासालाही महत्व द्यावे. परिस्थितीचा कधीही विचार न करता संघर्षाची तयारी ठेवल्यास यश नक्की मिळते. अशा प्रतिकूलतेत मिळविलेल्या यशाचा आनंद जगावेगळा असतो. त्यामुळे मोठी स्वप्ने बघून ती पूर्ण करण्यासाठी धडपड करा असे प्रतिपादन निफाडचे तहसीलदार दीपक पाटील यांनी केले.

लासलगाव येथील श्री महावीर विद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष सेल्स टॅक्स डेप्युटी कमिशनर नाशिक येथील प्रशांत शेळके होते. प्रमुख अतिथी म्हणून लासलगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक खंडेराव रंजवे, येवला येथील युवा सेना नेते कुणाल दराडे, नाशिकचे नामवंत डॉ. तुषार संकलेचा, वाकी ब्रु.चे सरपंच दत्ताजी वाकचौरे, प्रसिध्द व्यापारी अनिल ब्रम्हेचा, बिपीन ब्रम्हेचा, सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ निकम, निफाड पं.स चे गटशिक्षणाधिकारी केशव तुंगार, प्रसिध्द व्यापारी ऋषभ भंडारी आदि मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी लासलगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक खंडेराव रंजवे यांनी विद्यार्थ्यांनी आई, वडील व शिक्षक यांना आदर्श मानून वाटचाल केल्यास जीवनात यश नक्कीच मिळते असे सांगितले. विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात संगत चांगली ठेवावी, आपले सामान्य ज्ञान वाढवावे व आपले ध्येय निश्चित करून अभ्यास करावा असेहि सांगितले. प्रशांत शेळके, तुषार संकलेचा, कुणाल दराडे यांनी विद्यालयाच्या प्रगती बद्दल समाधान व्यक्त केले. पुढील वर्षापासून विद्यालयात योग व ध्यानधारणा यांचे वर्ग सुरु करण्यांत येतील असे संस्थेचे कार्याध्यक्ष जव्हेरीलाल ब्रम्हेचा व श्री महावीर विद्यालयाचे अध्यक्ष सुनील आब्बड यांनी सांगितले.

या वेळी इ.५ वी ते १२ वी मधील विविध क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिके देण्यात आली. यात इ.१० वी व १२ वी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी तसेच विविध बाह्य परीक्षा, चित्रकला, वकृत्व, क्रीडा, सांस्कृतिक कार्यक्रम इ.मधील यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. विद्यालयाचे आदर्श विद्यार्थी म्हणून पूजा भाऊसाहेब सानप, कृष्णा मुकेश बागुल यांना गौरविण्यात आले.

या कार्यक्रमास संस्थेचे कार्याध्यक्ष जव्हेरीलाल ब्रम्हेचा, मानद सचीव शांतीलाल जैन, श्री महावीर विद्यालयाचे अध्यक्ष सुनील आब्बड, जैन प्राथमिक विद्यामंदिरचे अध्यक्ष महावीर चोपडा, आय टी आय चे अध्यक्ष मोहन बरडीया, संस्थचे विश्वस्त अजय ब्रम्हेचा, अमित जैन, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष ब्रम्हेचा, सदस्य राहुल बरडीया, दर्शन साबद्रा, अजित आब्बड व श्री महावीर विद्यालयाचे प्राचार्य दिलीप डुंगरवाल, पर्यवेक्षक मधुकर बोडके, जैन प्राथमिक शिक्षण मंदिराच्या मुख्याध्यापिका श्रीमती नलिनी शिंदे, आय.टी.आय चे प्राचार्य साहेबराव हांडगे, वसतिगृह अधीक्षक श्री धनपाल कोल्हापुरे, विभागप्रमुख कैलास भारती, कार्यालयीन अधीक्षक रवींद्र जाधव उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य दिलीप डुंगरवाल यांनी केले. तसेच सूत्रसंचालन उपशिक्षक राजेंद्र बनसोडे, ज्ञानेश्वर मोहन व पर्यवेक्षक मधुकर बोडके, विभाग प्रमुख कैलास भारती यांनी केले. आभार प्रदर्शन जैन प्राथमिक शिक्षण मंदिरचे अध्यक्ष महावीर चोपडा यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेच्या सर्व शाखांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्गाने मेहनत घेतली.

फेसबुक पेज लाईक करा – 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like