‘या’ कारणामुळं तब्बल 400 शिवसैनिकांनी केला भाजपात प्रवेश, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात सत्ता स्थापनेसाठी झालेले महानाट्य सर्वांनी पाहिले त्यानंतर अखेर शिवसेनेच्या नेतृत्वात काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मदतीने राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आणि उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर संपूर्ण राज्यात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा एकाच जल्लोष पहायला मिळाला.

मात्र शिवसेनेने सत्तेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी केलेली हातमिळवणी काही शिवसैनिकांना रुचलेली दिसत नाही. शिवसेनेने भ्रष्ट नेत्यांशी हातमिळवणी केल्याचे सांगत चक्क धारावीतील 400 कार्यकर्त्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत थेट भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

हिंदू पक्षा विरोधात असलेल्या पक्षांशी शिवसेनेने हातमिळवणी केल्याने आम्हाला फसवणूक झाल्यासाखे वाटत आहे अशी भावना शिवसेनेतून भाजपात गेलेल्या रमेश नाडार यांनी व्यक्त केली आहे. फक्त सत्तेसाठी शिवसेना महाविकास आघाडीत केल्याचे देखील अनेक शिवसैनिकांचे मत आहे. तसेच अनेक वर्षांपासून आम्ही शिवसेनेत राहून काँग्रेस आणि राष्ट्रवादी विरोधात लढलो. शिवसेनेसाठी ज्या जनतेकडे मते मागितली आता त्यांच्यासमोर आम्ही कसे जाणार असे देखील नाडार यावेळी म्हणाले.

निवडणुकीआधी जागावाटपावरून देखील भाजप शिवसेना यांच्यात तुतू मेमे झाली होती त्यावेळी शिवसैनिकांनी पक्षासाठी काम करत अनेक ठिकाणी भाजपचा प्रचार करण्याचे टाळले होते. मात्र राज्यात सत्तेसाठी वेगळेच गणित तयार झाल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता आणि अनेक शिवसैनिकांना हा निर्णय न पटल्याने त्यांनी सेनेतून राजीनामा द्यायला सुरुवात केली होती. रमेश सोळंकी हे देखील त्यापैकीच एक शिवसैनिक.

माझा अंतरात्मा आणि विचारधारा मला काँग्रेसोबत काम करण्यासाठी परवानगी देत नसल्याचे सांगत सोळंकी यांनी युवा सेनेच्या पदाचा राजीनामा दिला होता. तसेच जो माझ्या श्रीरामाचा (काँग्रेस) नाही तो माझ्या कोणत्याच कामाचा नाही अशा शब्दात त्यांनी शिवसेनेवर नाराजी व्यक्त केली होती.