10000 हजार रुपयांची लाच स्विकारताना प्रभारी सहाय्यक आयुक्त अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – मत्स पालनाचे कंत्राट देण्यासाठी आणि सरकारी अनुदान मिळवून देण्यासाठी 10 हजार रुपयांची लाच स्विकारताना जळगाव मस्य व्यवसाय कार्यालयातील प्रभारी सहाय्यक आयुक्त आणि कनिष्ठ लिपीकाला अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई आज (बुधवार) करण्यात आली. या कारवाईमुळे मस्य विभागातील भ्रष्टाचार उघडकीस आला असून लाचखोरांचे धाबे दणाणले आहेत.

प्रभारी सहाय्यक आयुक्त रमेशकुमार जगनाथ धडील (वय- 55 रा- मुकूंद अपार्टमेंट,फ्लॅट नं.6, शिखरेवाडी, नाशिक. ता.जि.नाशिक), कनिष्ठ लिपीक रणजीत हरी नाईक (वय-49, रा.प्लॉट नं. 29, रायसोनी नगर, जळगाव) असे लाच स्विकारताना रंगेहाथ पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी जळगाव येथील 37 वर्षीय तक्रारदाराने जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे मंगळवारी (दि.24) तक्रार दिली आहे.
तक्रारदार यांचा मत्स्य व्यवसाय असुन त्यांनी वाघुर धरणावर पिंजरा पद्धतीने मत्स्य पालनाचे कंत्राट घेतलेले आहे. सदर मत्स्य पालन व्यवसायाला मिळणारे सरकारी अनुदान मिळवुन देण्यासाठीच्या कागदपत्रांची पुर्तता करून घेवून उत्कृष्ट अहवाल देण्याच्या मोबदल्यात तक्रारदार यांचेकडे मंगळवारी धडील यांनी 10 हजार रुपायांची लाच मागितली. तक्रारदारांनी याची तक्रार जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. पथकाने पंचासमक्ष पडताळणी केली असता धडील यांनी आज लाच स्वीकारली.

ही कारवाई नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक सुनिल कडासने, अपर पोलीस अधीक्षक निलेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक एम. ठाकुर, पोलीस निरीक्षक निलेश लोधी, संजोग बच्छाव, पोलीस हेड कॉन्स्टेबल सुरेश पाटील, पोलीस नाईक मनोज जोशी, पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत ठाकुर, प्रविण पाटील, नासिर देशमुख, ईश्वर धनगर यांच्या पथकाने केली.

सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या १०६४ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.

Visit : policenama.com

You might also like