मराठवाडा : बहिणीकडून राखी बांधून घेतल्यानंतर अभियंता तरुणाची आत्महत्या

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीकडून राखी बांधून घेतल्यानंतर भावाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. हा तरुण अभियंता असून त्याने सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास ठाकरेनगर भागात ही घटना घडली. रुपेश दगेंद्र बिऱ्हाडे (वय-26) असे आत्महत्या केलेल्या अभियंता तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रुपेश हा एका खाजगी कंपनीत नोकरीला होता. सोमवारी सायंकाळी त्याच्या नात्यातील बहिणी त्याला राखी बांधण्यासाठी आल्या होत्या.

राखी बांधल्यानंर रात्री सव्वानऊच्या सुमारास तो खोलीत गेला. त्याचे वडील त्याला जेवणासाठी बोलवण्यासाठी गेले असता त्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. मयत रुपेश याची आई शिक्षिका असून, वडिल निवृत्त प्राध्यापक आहेत. रुपेशला जुळा भाऊ आहे. याप्रकरणी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत. चार दिवसांपासून रुपेश कोणाशीही बोलत नसल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

मी रक्षाबंधनाला नसेल, असा मेसेज करून भावाची आत्महत्या
रात्रीचे जेवण करून फिरायला म्हणून बाहेर पडलेल्या प्रद्युम्न ईश्वर वरकड (वय-20 रा. सारा वैभव सोसायटी, जटवाडा, रोड, हर्सूल) या तरुणाने रविवारी रात्री दहाच्या सुमारास तलावात उडी घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्याने बहिणीला मेसेज पाठवला होता. यामध्ये त्याने,ताई मी उद्या रक्षाबंधनाला नसेल, असे लिहले होते. याप्रकरणी हर्सूल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू नोंद करण्यात आली आहे.