वजन कमी करत असाल तर ‘हे’ 6 पदार्थ खाणं आजच बंद करा !

पोलीसनामा ऑनलाईन टीम :  अनेकजण वजन कमी करण्यासाठी एक्सरसाईज करतात डाएटींगही करतात. तरीही काही फरक दिसत नाही. कारण काही पदार्थ तुमच्या आहारात असतात जे बंद करणं गरजेचं असतं. परंतु तुम्हाला त्याबद्दल माहितीच नसतं. जाणून घेऊयात ते पदार्थ कोणते आहेत जे खाणं बंद करणं गरजेचं आहे.

1) सोयाबीन तेल – यात सॅच्युरेटेड फॅट्स जास्त असल्यानं वजन वाढतं. 2016 साली झालेल्या एका रिसर्चनुसार, वजनवाढीसाठी सोयाबीन तेल हे शुगरपेक्षा जास्त प्रमाणात जबाबदार असतं. यात ओमेगा 6 अ‍ॅसिड्स जास्त असतात. याचं थोडं सेवन केलं तर आरोग्यासाठी चांगलं असतं. परंतु याच्या जास्त सेवनानं वजन वाढतं.

2) एक्स्ट्रा शुगर आणि क्रिम कॉफी – कॉफी वजन कमी करण्यात मदत करते. परंतु यात एक्स्ट्रा शुगर आणि क्रिम कॉफी तुम्ही घेत असाल तर वजन वेगानं वाढेल. याशिवाय कॉफीचं सेवनही प्रमाणात असायला हवं.

3) ब्रेड – यामध्ये रिफाईन्ड मैदा आणि शुगर असते. त्यामुळं वजन कमी करायचं असेल तर व्हाईट ब्रेडचं सेवन करणं बंद करा. यामुळं ब्लड शुगरही वाढते. परिणामी वजन जास्त वाढतं.

4) बिअर – तुम्हाला वाटत असेल की, मद्यसेवनानं वजन वाढणार नाही, तर हा तुमचा गैरसमज आहे. कारण यात कॅलरीजचं प्रमाण जास्त असतं त्यामुळं वेगानं वजन वाढतं. यासाठी बिअर पित असाल तर वेळेत बंद करा.

5) पॅकिंग फूड – पॅकिंग फूड आरोग्यासाठी घातक तर असतातच परंतु यामुळं वजनही वाढतं. त्यामुळं बिस्कीट, कुकीज, इतर गोड पदार्थ, सोडा कोल्ड ड्रींक यांचं सेवन बंद करायला हवं.