शिवसेनेला कुणीही ‘शहाणपणा’ शिकवण्याची गरज नाही, संजय राऊतांचा देवेंद्र फडणवीसांवर ‘निशाणा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज बाळासाहेब ठाकरे यांच्या 7 व्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करताना ट्विटरवर व्हिडीओ शेअर केला आहे. स्वाभिमान आणि हिंदुत्वाचा बाणा कधीही सोडू नका, असा संदेश या व्हिडिओत बाळासाहेब देताना दिसत आहेत. यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी शिवसेनेला कुणीही शहाणपणा शिकवण्याची गरज नाही. आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत असे प्रत्युत्तर दिले आहे. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त संजय राऊत यांनी शिवतीर्थावर बाळासाहेबांना आदरांजली अर्पण केली. त्यावेळी ते बोलत होते.

संजय राऊत म्हणाले की, ‘उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांना दिलेली शपथ पूर्ण होणार हे निश्चित आहे. शिवसेनेला कोणी स्वाभिमान व शहाणपणा शिकवू नये. आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत. स्वाभिमान, हिंदुत्व या सगळ्यांना योग्यवेळी उत्तरे मिळतील. मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार आहे.’

उद्यापासून संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू होत असून, खासदार असलेले संजय राऊत अधिवेशनासाठी दिल्लीला रवाना होतील. मात्र, दरम्यानच्या काळात राऊत हे काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींची भेट घेऊन राज्यातील सत्तास्थापनेबाबत चर्चा करतील अशी माहिती मिळाली आहे.

Visit : Policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like