Balasaheb Thorat | फडणवीसांची घोषणा प्रत्यक्षात उतरत नाही, मध्यावर्ती निवडणुकांबाबत थोरातांनी लगावला टोला

संगमनेर : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama online) – देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) नेहमी काही ना काही घोषणा देत असतात. पण ती प्रत्यक्षात उतरत नाही. मध्यावर्ती निवडणुका (midterm elections maharashtra) होणार नाहीत. दोन वर्षे आघाडी सरकार (MVA Government) चाललंय. आणखी तीन वर्षे चालेल पुन्हा आघाडी सरकार आले तर आश्चर्य मानू नेये, असे म्हणत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी फडणवीस यांना टोला लगावला. बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलत होते.

बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते दंडकारण्य अभियानाचा वृक्ष लागवड करुन शुभारंभ करण्यात आला. संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथील डोंगरावर वृक्षारोपण करुन अभियानाची सुरुवात करण्यात आली. यावेळी पत्रकारांशी बोलताना थोरात यांनी राज्यातील घडमोडींवर बोलताना देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.

फडणवीसांची घोषणा प्रत्यक्षात उतरत नाही
मध्यवर्ती निवडणूका झाल्या तर आघाडी सरकार धाराशाई होईल असं वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. यावर बोलताना थोरातांनी फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. फडणवीसांची नेहमी काही ना काही घोषणा असते पण ती प्रत्यक्षात उतरत नाही. मध्यावर्ती निवडणुका होणार नाहीत. दोन वर्षे आघाडी सरकार चाललंय आणिखी तीन वर्षे चालेल. पुन्हा आघाडी सरकार आले तर आश्चर्य मानू नये, असं विधान थोरात यांनी केलं आहे.

इंधन दरवाढीकडे त्यांनी लक्ष द्यावं

देवेंद्र फडणवीस यांनी कँग्रेस आंदोलनावर टीका करण्यापेक्षा केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल आणि गॅसची केलेली दरवाढ कमी करुन सर्वसामान्य माणसांना महागाईचे जे चटके बसतायत त्या संदर्भात त्यांनी लक्ष द्यावे. त्यांचं केंद्रात चांगलं वजन आहे. ते इंधनाचे दरवाढ कमी करण्यासाठी वापरावे, असा सल्लावजा टोला थोरात यांनी फडणवीसांना लगावला.

विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडेच
भास्कर जाधव यांनी पावसाळी अधिवेशन उत्तमरित्या गाजवले आहे. पण शिवसेनेनं अध्यक्षपदावर अद्याप कोणताही दावा केलेला नाही. काँग्रेसचा अध्यक्ष राहील तो निर्णय यापूर्वीच झालेला आहे. तिन्ही पक्षांनी मिळून हा निर्णय घेतला आहे, त्यामुळे यात काहीही बदल होणार नाही. भास्कर जाधव यांच्यासारखे तडाखेबाज नेते काँग्रेसमध्ये देखील आहेत, असेही थोरात यांनी सांगितलं.

निवडणुका एकत्रित लढणार
महाविकास आघाडी सरकारमध्ये आम्ही तीन पक्ष आहोत.
तिघांनाही पक्ष वाढवण्याची गरज आह. तो प्रत्येकाला अधिकार आहे.
त्या दृष्टीने आम्ही करत असतो. त्यात चुकीचे काहीही नाही.
शिवसेनेचा स्वबळाचा नारा दिला असं कुठेही मला दिसत नाही.
शक्य तितक्या निवडणुका एकत्रित लढणार आहोत, असं सूचक विधान थोरात यांनी केलं.

Web Title :- Balasaheb Thorat | congress leader balasaheb thorat on devendra fadanvis midterm elections maharashtra statement

Join our Whatsapp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Viral Video | लग्नात वधूला मिठाईच्या बॉक्समध्ये मिळाले असे गिफ्ट, पाहताच बदलला चेहर्‍याचा रंग, पहा मजेदार व्हिडीओ

Pune News | शेरेबाजी करण्यापेक्षा पाटील यांनी रखडलेले प्रकल्प मार्गी लावावेत – माजी आमदार मोहन जोशी

फायद्याची गोष्ट ! मुलांसाठी ‘या’ बँकेनं ने सुरू केली विशेष सुविधा, राहणार नाही भविष्याची चिंता; होईल मोठा फायदा

Nitesh Rane | व्यासपीठावरील शिवसेना नेत्यासमोर नितेश राणेंचे युतीबद्दल वक्तव्य