क्रिकेट विश्वाला धक्का ! वर्ल्ड कप संघातील 21 वर्षीय खेळाडूची आत्महत्या

ढाका : पोलीसनामा ऑनलाईन –   बांगलादेशाचा माजी अंडर -19 क्रिकेटपटू मोहम्‍मद सौजिबने (mohammad sozib) शनिवारी (दि. 14) राहत्या घरी आत्महत्या (suicide-at-his-residence) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 21 वर्षीय सौजिब अंडर-19 वर्ल्ड कप (Under*19 Cricket World cup) संघातही सामिल होता. स्टॅंड बॉय खेळाडू म्हणून त्याचा समावेश केला होता. दरम्यान, मोहम्‍मद सौजिबन हे पाऊल डिप्रेशनमुळे उचलले आहे की, आणखी कोणत्या कारणाने हे अद्याप समजू शकले नाही. त्याच्या आत्महत्येमुळे क्रिकेट विश्वालाही मोठा धक्का बसला आहे.

मोहम्मद सौजिबने 2018 मध्ये शिनेपुकुरकडून लिस्ट ए संघाकडून पदार्पण केले होते. त्याला विशेष चांगली कामगिरी करता आली नव्हती. त्यानंतर 2018 मध्ये त्याला संघात स्थान मिळे नाही. बांगाबंधु टी-20 कपमध्येही त्याची निवड झाली नाही. बांगलादेश क्रिकेट बोर्ड गेम डेव्हलपमेंट्स मॅनेजर अबु इनाम मोहम्‍मद यांनी सांगितले की, या स्पर्धेतून बाहेर गेल्यामुळे कदाचित सौजेबने हे धक्कादायक पाऊल उचलले असावे.

बीडी क्रिकटाइमशी संवाद साधताना अबु म्हणाले की, सौजिब सैफ आणि आफिफ हुसेन यांनी 2018 च्या अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये होते. वर्ल्ड कपमध्ये स्टॅंडबॉय होते. आशिया कपमध्ये तो श्रीलंकेविरुद्ध खेळला होता. मात्र त्यानं घेतलेल्या या निर्णयामुळे आम्ही खूप दु:खी आहोत. मोहम्‍मद सौजिबच्या आत्महत्येचे कारण अदयाप समजू शकले नाही. मात्र गेल्या वर्षापासून मोहम्मद नियमित क्रिकेट खेळत नव्हता. तो केवळ ढाकामध्ये प्रीमिअर लीग खेळला होता. बांगलादेश क्रिकेट बोर्डचे प्रमुख खालेद महमूद यांनी सौजिब एक प्रतिभावंत खेळाडू असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, मला विश्वास बसत नाही. मला ही बातमी ऐकून खूप वाईट वाटले. सौजिब सलामी फलंदाज होता, त्याचबरोबर गोलंदाजी उत्तर करत असे.