ब्लड प्रेशर आणि वजन कमी करण्यासाठी ‘असा’ करा जवसचा वापर !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   जर तुम्हाला ब्लड प्रेशर किंवा लठ्ठपणाची समस्या जाणवत असेल किंवा कधी या समस्या होऊ द्यायच्या नसतील तर घरगुती वापरातील एका पदार्थाचं सेवन करूनही तुम्ही आरोग्य चांगलं ठेवू शकता. हा पदार्थ आहे जवस.

जवसाचं सेवन करण्यासाठी तुम्हाला जवसाचं पाणी तयार करावं लागेल. वजन कमी करण्यासाठी याचा खूप फायदा होतो.

कसं तयार करायचं जवसाचं पाणी ?

– अर्धा लिटर पाणी गरम करा.
– पाणी उकळल्यांतर त्यात अर्धा कप जवस घाला
– यात एक दालचिनीची तुकडा घाला.
– 30 मिनिटे उकळून घ्या
– आता गॅस बंद करून पाणी गाळून घ्या
– यात चवीसाठी मध किंवा लिंबू घाला
– दिवसातून 2 वेळा या पाण्याचं सेवन करा.

जवसाच्या पाण्याचे फायदे

– कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहून हृदयाला चांगला रक्तपुरवठा होतो.

– शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडतात.

– यामुळं शरीराला मोठ्या प्रमाणात अँटी ऑक्सिडंट आणि व्हिटॅमिन्स मिळतात.

– शरीराला आवश्यक आयर्न, मँगनीज हे घटक मिळतात

– शरीरातील एक्स्ट्रा फॅट्स निघून जातात.