बीड : स्कार्पिओ दरीत कोसळून 2 ठार 1 जखमी

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – भरधाव वेगात जाणाऱ्या स्कार्पिओ चालकाचे नियंत्रण सुटल्याने खोल दरीत गाडी कोसळून झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना आज (शनिवार) सायंकाळी सहाच्या सुमारास मांजरसुंबा येथे घडली. अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे अद्याप समजू शकले नाहीत. जखमीवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

मांजरसुंबाकडून बीडच्या दिशेने येणाऱ्या स्कार्पिओ चालकाचा ताबा सुटल्याने स्कार्पिओ दरीत कोसळली. या घटनेची माहिती मिळताच बीड ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना बीड जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखले केले. मात्र, उपचारासाठी नेत असताना दोघांचा वाटेतच मृत्यू झाला. डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषीत केले. तर जखमी झालेल्या एकावर उपचार सुरु आहेत.

मृत आणि जखमी व्यक्तींची नावे अद्याप समजू शकली नसून हे तिघेजण बीड येथील शाहूनगर येथील असल्याची प्राथमिक माहिती आहे. जखमी व्यक्तीवर जिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करुन पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथील रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Visit : Policenama.com 

शिंक कधीच दाबून ठेऊ नका, शरीरावर होऊ शकतात ‘हे’ गंभीर परिणाम
अभिनेत्री मलाइका अरोडा म्हणते, ‘खास डाएटपेक्षा नेहमी पौष्टिक आहार घ्यावा’
प्रेशर कुकर वापरताना ‘हे’ १० नियम आवश्य पाळा…आणि सुरक्षित रहा
मानसिक, शारिरीक आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर ‘हे’ जरूर वाचा
उर्जा आणि उत्साह दिवसभर टिकवण्यासाठी ‘हे’ आवश्य करा, जाणून घ्या
संक्रमणापासून बचावासाठी करा; या विटॅमिनचा वापर, जाणून घ्या –
चांगल्या आरोग्यासाठी शरीराला दररोज किती कॅलरीजची असते आवश्यकता –
वजन कमी करण्याचा ‘हा’ आहे खास ‘जपानी फार्मुला’! जाणून घ्या