बटाट्याचे ‘हे’ फायदे वाचल्यानंतर दूर होतील सर्व गैरसमज ! जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   अनेकजण वजन वाढेल भीतीनं बटाटा खाणं टाळतात. तसं पाहिलं तर स्वयंपाकघरात बटाट्याचं स्थान महत्त्वाचं आहे. बटाटा खाण्याचे आपल्या शरीराला अनेक फायदे होतात, आज याच फायद्यांबद्दल आपण माहिती घेणार आहोत.

बटाटा खाण्याचे फायदे पुढीलप्रमाणे –

1) बटाट्यात शीतल आणि मधुर रस गुणधर्म असतात. त्यामुळं तो मलावष्टंभक आहे.

2) जर अशक्तपणा येत असेल तर अशात तुम्ही बटाट्याचं सेवन करू शकता.

3) स्कार्व्ही या विकाराच्या रुग्णांकरिता बटाटा गुणकारी आहे.

4) सालीसकट बटाटा खाल्ला तर दाट बळकट होतात.

5) चटका बसल्यास किंवा भाजलं असेल तर त्या ठिकाणी फोड येतो. अशा फोडांवर बटाटा उगाळून लावला जातो.

6) बाळंत स्त्रीला दूध कमी असेल तर दूध वाढवण्यासाठी बटाटा उपयुक्त ठरतो.

7) जर तोंड आलं असेल तर बटाटा उकडून खावा.

8) बटाट्याच्या पानात जवखार आहे. लघवी आडल्यास बटाट्याच्या पानांचा रस घ्यावा.

कच्चा बटाटा खाल्ला तर येऊ शकतात पुढील समस्या

– कच्चा बटाटा दाह निर्माण करतो.

– बद्धकोष्टता वाढते.

– सतत सर्दी, शिंका यांचा त्रास असणाऱ्यांनी बटाटा खाऊ नये.

– बटाटा जास्त खाल्ल्यानं अग्नी मंद होतो.

– मधुमेही किंवा रक्तात चरबी वाढलेल्या स्थूल व्यक्तींनी बटाटा पूर्णपणे वर्ज्य करावा

– शरीरात सर्वत्र सूज आली असताना बटाटा वर्ज्य करावा.

– वारंवार जुलाब, पोटदुखीची तक्रार असणाऱ्यांनी बटाटा खाऊ नये.

टीप –  वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये. काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.