PAN CARD : पॅन कार्ड मिळवण्यासाठी ‘या’ पध्दतीनं करा ऑनलाइन अर्ज, जाणून घ्या प्रक्रिया

ADV

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –    प्रत्येक भारतीयासाठी पॅनकार्ड आवश्यक कागदपत्र आहे. हे प्राप्तीकर विभागाकडून दिले जाते. पॅनकार्ड आर्थिक व्यवहारांसाठी आवश्यक असते, यासाठी करदात्यांसाठी याचे महत्व वाढते. पॅनकार्ड कोणत्याही व्यक्तीच्या पैशाचा इनफ्लो आणि आऊटफ्लो ट्रॅक करण्यासाठी उपयोगी आहे. पॅनकार्डसाठी अर्ज करणे खुप सोपे आहे. ऑनलाइन माध्यमातून पॅनकार्डमधील माहिती दुरूस्त करण्यासाठी सुद्धा विनंती करता येते. जाणून घेवूयात ऑनलाइन माध्यमातून पॅनकार्डसाठी कशाप्रकारे अर्ज करतो येतो.

असा करा अर्ज

ADV

स्टेप 1. सर्वप्रथम तुम्हाला UTITSL पोर्टलवर जावे लागेल.

स्टेप 2. येथे होम पेजच्या खालील ‘Apply for new PAN card (Form49AA)’ टॅबवर क्लिक करावे लागेल.

स्टेप 3. आता तुमच्या स्क्रीनवर Form 49AA उघडेल.

स्टेप 4. तुम्हाला हा फॉर्म दिलेल्या निर्देशानुसार भरावा लागेल. यानंतर कॅप्चा कोड टाकून सबमिटवर क्लिक करा.

स्टेप 5. आता फॉर्ममध्ये भरलेली माहिती वाचून व्हेरीफाय करा. यानंतर ऑनलाइन पेमेन्टसाठी ‘Make Payment’ वर क्लिक करावे लागेल.

स्टेप 6. पेमेन्ट यशस्वी झाल्यानंतर तुम्हाला भरलेला फॉर्म सेव्ह करावा लागेल. सोबतच त्याची प्रिंट सुद्धा काढून घ्या.

स्टेप 7. या प्रिंटेड फॉर्मवर अर्जदाराला आपले दोन फोटो चिकटवावे लागतील आणि हस्ताक्षर करावे लागेल.

स्टेप 8. अर्जदाराला या हस्ताक्षर केलेल्या फॉर्मसोबत ओळखपत्र, पत्त्याचा पुरावा, आणि जन्म तारखेचा पुराव्याची प्रत फॉर्ममध्ये सांगितलेल्या निर्देशानुसार जोडावी लागेल.

स्टेप 9. आता अर्जदाराला या फॉर्मसोबत कागदपत्र आणि पैसे भरल्याची पावती जोडून फॉर्म आपल्या जवळच्या युटीआयआयटीएसएल ऑफिसच्या पत्त्यावर जमा करावा लागेल.