राज्यात पुन्हा येऊ शकतं युतीचे सरकार, ‘या’ दिग्गज नेत्यानं सांगितला नवा ‘फॉर्म्युला’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. मोठ्या राजकीय भूकंपानंतर राज्यात तीन पक्षांचे सरकार आले. 28 नोव्हेंबरला उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र, निकालानंतर सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपला विरोधात बसण्याची वेळ आली. दरम्यान, अजित पवारांच्या मदतीने भाजपने सरकार स्थापन केले. मात्र, हे सरकार अवघ्या तीन दिवसांत कोसळले.

आता राज्यसभेचे भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी एक दावा केला आहे. तो म्हणजे, महाराष्ट्रात भाजप शिवसेनेचे सरकार पुन्हा सत्तेत येऊ शकते. खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी या संदर्भात नवा फॉर्म्युलाही दिला आहे. बुधवारी रात्री राज्यसभेत नागरिकत्व विधेयकावर शिक्कामोर्तब झाले. यानंतर सुब्रमण्यम स्वामी यांनी एक ट्विट केले. शिवसेनेने अजून हिदुत्वाची विचारधारा सोडलेली नाही, ही चांगली बाब आहे. नागरिकत्व विधेयकाविरोधात शिवसेनेने मत दिले नाही. भाजप आणि शिवसेनेने पुन्हा एकदा चर्चा सुरु करण्याची हिच योग्य वेळ आहे. शिवसेनेला अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद घेऊ शकते, असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

शिवसेनेने लोकसभेत नागरिकत्व विधेयकाच्या विरोधात मतदान केले होते. मात्र, बुधवारी राज्यसभेत मतदानाच्या आधीच शिवसेनेच्या खासदारांनी वॉकआऊट केले होते. या आधी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यसभेत शिवसेनेवर कडाडून टीका केली होती. त्यावेळी त्यांनी सत्तेसाठी लोक केव्हा कसा रंग बदलात, असे अमित शहा म्हणाले होते.

पोलीसनामाचे फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/