भाजपाची ‘चित भी मेरी, पट भी मेरी’ ! सरकार ‘तरले’ तरी आणि ‘पडले’ तरी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन  – महाराष्ट्रातील सर्वात मोठे राजकीय कुटुंब असलेल्या शरद पवार यांच्या बारामतीत धडक मारण्याची अनेक प्रयत्न यापूर्वी भाजपाने केले. पण, ते अयशस्वी ठरले. आता त्यांनी थेट पवार कुटुंबातील वारसदारवरुन सुरु असलेल्या रस्सीखेचाचा फायदा उठवत कुटुंबात अजित पवार यांच्या रुपाने छेद करण्यात भाजपाला यश आले आहे. अजित पवार यांच्या पाठिंब्याने देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री झाले.

आता फडणवीस सरकार तरले तरी भाजपाचा विजय होणार आहे. तर ते पडले तरी त्याचे अपयश अजित पवार यांच्या माथी मारुन त्यांच्यामागे आमदार नसल्याने पक्षात त्यांचे स्थान नव्हते. हे सिद्ध होईल. एक प्रकारे काहीही झाले तरी भाजपा ‘चित भी मेरी, पट भी मेरी’म्हणण्याची शक्यता आहे. या राजकारणात भाजपाचा कोणताही तोटा होणार नाही.

कारण सरकारने विश्वास दर्शक ठराव जिंकला तर त्याला आपोआपच पुढील काळात अनेक जण पाठिंबा देण्याची शक्यता आहे. आणि जर अजित पवार यांच्या मागे पुरेसे आमदार आले नाही तर ते अजित पवार यांचे पक्षात वर्चस्व नव्हते, हे सांगतील. त्याचबरोबर अजित पवार यांना शरद पवार यांच्यापासून दूर केले आहे. राज्यातील सर्वात मोठ्या राजकीय कुटुंबातील कलहाला प्रत्यक्षात समोर आणल्याने आता राज्यातील मोठ्या विरोधी पक्षात फाटाफुट घडवून आणण्यात यश मिळविले आहे. त्यामुळे पुढील काळात अजित पवार हे जरी राष्ट्रवादीत परतले तरी एकदा संशयाचे वातावरण आता तयार झाल्याने ते पुन्हा पूर्णपणे साधले जाण्याची शक्यता नाही. भविष्यातील राजकारणाच्या दृष्टीने हे भाजपासाठी मोठे यश मानले जाऊ शकते.

फडणवीस सरकारला अजित पवार यांच्यामागे पुरेसे आमदार मिळाले नाहीत तरी, दुसऱ्या बाजूने इतर आमदारांना फोडण्याचा प्रयत्न भाजपा करीत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे काही आमदार व इतर पक्षातील काही आमदार यांच्या सहकार्याने सरकारने विश्वास दर्शक ठराव जिंकला तरी शरद पवार यांच्या राजकारणावर प्रश्नचिन्ह उमटण्याची शक्यता आहे.

अजित पवार पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये परतले नाही तर, पुढील निवडणुकीत बारामतीतून अजित पवार उभे राहिले तर त्यांच्याविरोधात शरद पवार यांना उमेदवार द्यावा लागणार आहे. त्यामुळे प्रत्यक्ष निवडणुकीत पवार विरुद्ध पवार अशी लढत होऊन त्यात प्रत्यक्ष बारामतीमधून कोणत्या तरी एका पवारांचा पराभव घडवून आणण्यात भाजपाला यश मिळणार आहे.

अजित पवार पुढील काळात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये परतले तरी, आता पूर्वी इतका विश्वास राहणार नाही़
एकंदरीत अजित पवार यांना फुटून भाजपाने एकावेळी अनेक गोष्टी साध्य केल्या आहेत.

Visit : Policenama.com