कसबा मतदारसंघातून भाजपच्या मुक्ता टिळक विजयी

कसबा : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपचा बालेकिल्ला असलेल्या कसबा मतदार संघातून मुक्ता टिळक यांनी विजयी गुलाल उधळा आहे. त्यांनी राष्ट्रवादीचे अरविंद शिंदे यांचा पराभव केला आहे.

कसबा हा मतदारसंघ पुण्याचे खासदार गिरीश महाजन यांचा मतदारसंघ आहे. २०१९ लोकसभा निवडणुकीत गिरीश महाजनांना खासदारकीची लॉटरी लागल्यानंतर विधानसभेसाठी मुक्ता टिळक यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली.

कसब्यात काँग्रेस ऐवजी मनसेच्या अजय शिंदेंकडूनही यंदा कडवी टक्कर पहायला मिळेल असा अंदाज होता. मात्र या सर्व शक्यता फोल ठरवत मुक्ता टिळक यांनी बाजी मारली आहे. कसब्या व्यतिरिक्त पुण्यामध्ये भाजपला अनेक ठिकाणी पराभवाला सामोरे जावे लागत आहे.

Visit : Policenama.com