…म्हणून शरीराला सकस आहाराची गरज !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   तुम्हाला फिट आणि निरोगी रहायचं असेल तर पहिली स्टेप आहे ती म्हणजे सकस आहार घेणं. ज्यात प्रथिने, जीवनसत्व आहेत असा संतुलित आणि सकस आहार शरीरासाठी खूप गरजेचा असतो. आज चिंता आणि नैराश्य अशा समस्या वाढताना दिसत आहेत. लोक तणावात असताना जास्त खाण्याकडे वळतात. असंही समोर आलं आहे की, दु:खी असताना लोक जास्त आवडीच्या पदार्थाकडे वळाले आहेत.

आपल्या आतड्याच्या आतील आवरणात सिरोटीन हे रसायन असतं. सिरटीनमुळं आपल्याला तात्पुरता आनंद मिळतो. खाल्ल्यानंतर तणाव दूर झाला असं वाटतं. परंतु तणावात जास्त प्रमाणात खाल्ल्यानं अॅनोरेक्झियासारखी समस्या येण्याची शक्यता असते. तणावात असताना जास्त खाण्याकडे जर आपण जास्त आकर्षित होत असू तर याचा विचार नक्की करा की, शरीराची गरज म्हणून आपण खात आहोत की, जीभेचे चोचले पुरवण्यासाठी खात आहोत. जे पदार्थ शरीरासाठी पोषक नाहीत त्यांचं सेवन करणं शरीरासाठी हानिकारक ठरतं. असं करणं टाळायला हवं.

जेव्हा आपण आरोग्यासाठी हानिकारक असणाऱ्या पदार्थांचं सेवन करतो तेव्हा थकवा, चिडचिडेपणा, चिंता, नैराश्य, तणाव अशा अनेक विकारांना आमंत्रण देत असतो. त्यामुळं प्रथिने आणि जीवनसत्वांनी युक्त संतुलित आहार आपल्याला ऊर्जावान आणि निरोगी ठेवतो.