रियाला अंकिता लोखंडेची ’चपराक’ ! सुशांतचा व्हिडीओ दाखवून म्हणाली – ‘हा क्लस्टर फोबिया आहे का ?’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणून समोर येत असलेली त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीची मुलाखत एक टीव्ही चॅनल दाखवणार आहे. सुशांतच्या मृत्यूनंतर हा रियाचा पहिला टीव्ही इंटरव्ह्यू असेल. याबाबत सोशल मीडियावर जोरदार गोंधळ सुरू आहे. लोक त्या टीव्ही चॅनलला बायकॉट करण्याबाबत बोलत आहेत, ज्यावर हा इंटरव्ह्यू प्रसारित केला जाणार आहे.

सुशांतची बहिण श्वेताने सुद्धा हा इंटरव्ह्यू न दाखवण्याबद्दल वक्तव्य केले आहे. मात्र इंटरव्ह्यूची एक झलक अगोदरच रिलिज करण्यात आली आहे यामध्ये रिया सुशांत आणि तिच्या एका औषधाचा उल्लेख करताना ऐकू येत आहे. आता रियाच्या याच वक्तव्याला चुकीचे ठरवत सुशांतच्या एक्स-गर्लफ्रेंडने एक व्हिडिओ रिलिज केला आहे.

रियाने इंटरव्ह्यूच्या दरम्यान सांगितले 2013 मध्ये सुशांतला एक डिप्रेशनची समस्या झाली होती, त्यानंतर त्याने ’मोडाफिनिल’ नावाचे एक औषध ठेवण्यास सुरूवात केली होती. जेव्हा तो कधी फ्लाइटमध्ये बसत असे, हे औषध खात होता. युरोप ट्रिपसाठी सुद्धा जेव्हा निघाला होता, तेव्हा हे औषध त्याने खाल्ले होते. 2013 मध्ये त्याची डिप्रेशनची समस्या सुरू होती तेव्हा त्याने हरीश शेट्टी नावाच्या मानोसोपचार तज्ज्ञाकडे उपचार सुद्धा केला होता.

https://www.instagram.com/lokhandeankita/?utm_source=ig_embed

याचे उत्तर देण्यासाठी अंकिता लोखंडेने एक व्हिडिओ रिलिज केला आणि विचारले की, हा क्लस्टर फोबिया आहे का. तुला नेहमी उड्डाण घ्यायचे होते आणि तू करून दाखवले. खरंतर, प्रकरण उड्डाणाला घाबरण्याचे आहे. रिया चक्रवर्तीचा दावा होता की, सुशांतच्या जीवनात 2013 मध्ये असे काही झाले, ज्यानंतर त्याला उड्डाणाची भिती वाटू लागली होती. जेव्हा तो विमान प्रवास करत असे औषध खात असे. परंतु, यास चुकीचे ठरवत अंकिताने व्हिडिओ जारी केला आहे, ज्यामध्ये सुशांत फ्लाइट चालवताना दिसत आहे. प्रत्यक्षात सुशांतने बनवलेल्या ड्रीम लिस्टमध्ये त्याने फ्लाइट चालवण्याचे स्वप्न पाहिले होते, जे त्याने नंतर पूर्ण केले होते.

अंकिताच्या या व्हिडिओशिवाय सुशांतचा आणखी एक व्हिडिओ सुद्धा वायरल होत आहे, ज्यामध्ये तो फ्लाइट चालवण्याबाबत बोलत आहे की, त्याला केवळ लायसन्सन मिळत नाही, ते आले की, तो उड्डाण घेईल. ट्विटरवर सतत हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला जात आहे की, रिया चक्रवर्तीचे वक्तव्य निराधार आहे.