‘देसी गर्ल’ प्रियंकाला 4 वर्षांपूर्वी मिळाला होता ‘पद्मश्री’ पुरस्कार ! पोस्ट शेअर करत सांगितलं खास असण्याचं कारण

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –    बॉलिवूड स्टार प्रियंका चोपडा (Priyanka Chopra) आपल्या स्टाईल आणि फॅशनसाठी कायमच चर्चेत असते. तिचे अनेक आउफिट्स आजवर चर्चेचा विषय ठरले आहेत. प्रियंका चोपडा सध्या पती निक जोनास (Nick Jonas) सोबत मॅरिड लाईफ एन्जॉय करत आहे. आज ती ग्लोबल स्टार म्हणून ओळखली जाते. अलीकडेच तिनं पद्मश्री (Padma Shri) पुरस्काराचे काही फोटो सोशलवर शेअर केले आहेत. तिनं हे सांगितलं आहे की, हे तिच्यासाठी खास का होतं. प्रियंका पुन्हा एकदा वडिलांची आठवण काढत भावुक होताना दिसली. तिला 4 वर्षांपूर्वी पद्मश्री मिळाला होता.

प्रियंकानं तिच्या इंस्टावरून पद्मश्रीचे काही फोटो शेअर करत एक पोस्ट लिहिली आहे. या ती लिहिते की, जेव्हा मी हे फोटो पाहते आणि ते दिवस आठवते, जेव्हा मला देशाचा चौथा सर्वांत मोठा नागरिक सन्मान मिळाला होता, असंख्य आठवणी परत येतात. माझ्या कुटुंबाच्या आनंदानं आणि अभिमानानं याला आणखी खास बनवलं. मिलिट्री बॅकग्राउंड असल्यानं मी सांगू नाही शकत की, अशा प्रकारचा सन्मान माझ्यासाठी आणि कुटुंबासाठी किती महत्त्वाचा आहे.

प्रियंका पुढं लिहिते की, माझी आजी, मोठे बाबा, माझी आई, भाऊ व मावशी आणि मामी सर्व लोक त्या दिवशी माझ्यासोबत होते. आयकॉनिक राष्ट्रपती भवन पाहून ते आनंदित झाले होते. फक्त माझे पप्पा तिथं शारीरिक रूपात उपस्थित नव्हते. परंतु मी त्यांना माझ्यासोबत घेऊन गेले. ते माझ्या प्रवासाचा हिस्सा होते आणि आहेत.

प्रियंकाची ही पोस्ट सध्या सोशलवर व्हायरल होत आहे. चाहत्यांसोबतच अनेक सेलेब्सनंदेखील या पोस्टवर कमेंट करत तिचं कौतुक केलं आहे. राजकुमार राव यानंही यावर कमेंट करत प्रतिक्रिया दिली आहे.

प्रियंकाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं, तर लवकरच ती व्हाईट टायगर सिनेमात दिसणार आहे. नेटफ्लिक्सवर रिलीज होणाऱ्या या सिनेमात तिच्यासोबत राजकुमार राव असेल. अशीही माहिती आहे की, पीसी (प्रियंका) संजय लीला भन्साळींच्या बैजू बावरा या आगामी सिनेमात रणवीर सिंगसोबत दिसणार आहे. याशिवाय ती अ‍ॅमेझॉन स्टुडिओजच्या शीला या सिनेमातही काम करणार आहे. या सिनेमात ती मां शीला आनंदची भूमिका साकारणार आहे. असंही म्हटलं जात आहे की, हॉलिवूडच्या मॅट्रीक्स 4 या सिनेमातही ती काम करण्याची शक्यता आहे. तिच्याकडे वी कॅन बी हिरोज (We Can Be Heroes) हा सिनेमाही आहे.