‘रश्मी रॅकेट’साठी हार्ड ट्रेनिंग करतेय तापसी पन्नू ! शेअर केले फोटो

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   बॉलिवूड स्टार तापसी पन्नू (Taapsee Pannu) हिनं तिच्या आगामी सिनेमाची शूटिंग सुरू केली आहे. रश्मी रॅकेट (Rashmi Rocket) असं या सिनेमाचं नाव आहे. अलीकडेच तापसीनं या सिनेमाचा फर्स्ट लुक शेअर केला आहे. सिनेमात तापसी अ‍ॅथलिटच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमाचं डायरेक्शन आकर्ष खुराना करणार आहेत.

अ‍ॅथलीटचा रोल चांगल्या प्रकारे साकारण्यासाठी तापसी खूपच मेहनत करताना दिसत आहे. तिनं ट्रेनिंगचे काही फोटोही सोशल मीडियावर शेअर केले आहेत. सिनेमाप्रति तिचं समर्पण यात स्पष्ट दिसत आहे. तापसीनं तिच्या चाहत्यांसाठी सिनेमाच्या सेटवरून अनेक फोटो शेअर केले आहेत.

तापसीनं तिच्या इंस्टावरून ट्रेनिंग सेशनचे अनेक फोटो शेअर केले आहेत. यातील 3 फोटो तिनं असे शेअर केले आहेत, ज्यात ती कठोर परिश्रम घेताना दिसत आहे. फोटोत तापसीनं काला टँक टॉप आणि गुलाबी व पांढरी शॉर्ट घातली आहे. ट्रेनर तिला गाईड करताना दिसत आहे.

सिनेमाबद्दल आणखी बोलायचं झालं तर सिनेमाची निर्मिती रोनी स्क्रूवालानं केली आहे. गेल्या आठवड्यात सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. तापसीनं शेअर केलेले फोटो सध्या सोशलवर व्हायरल होत आहेत. अनेकांनी तिचं डेडीकेशन पाहून तिचं कौतुक केलं आहे.

तापसीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं, तर काही दिवसांपूर्वीच ती थप्पड सिनेमात दिसली होती. यानंतर आता ती शाबाश मिठूमध्ये क्रिकेटरच्या भूमिकेत दिसणार आहे. पुढील वर्षी फेब्रुवारीत हा सिनेमा रिलीज होणार आहे. हा सिनेमा क्रिकेटर मिताली राजचं बायोपिक आहे. याशिवाय हसीन दिलरुबा हाही प्रोजेक्ट तिच्याकडे आहे. या सिनेमात तिच्यासोबत विक्रांत मेसी, हर्षवर्धन राणे, हंसिका मोटवानी, ताहिर शब्बीर असे कलाकार दिसणार आहेत. लूप लपेटा, रश्मी रॅकेट हे सिनेमेही तिच्याकडे आहेत. रश्मीचा रॅकेटचा फर्स्ट लुकही समोर आला आहे.

You might also like