Birthday Special : पैशांच्या चणचणीमुळं ‘बेड’ विकून जमीनवर झोपला, आज बॉलिवूडमधील सर्वात मोठा ‘अ‍ॅक्शन’ स्टार

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड अ‍ॅक्शन स्टार आणि डान्सिंग सुपरस्टार टायगर श्रॉफ आज 30 वर्षांचा झाला आहे. हृतिक रोशनसोबत वॉरसारखा हिट सिनेमा दिल्यानंतर आता टायगरचं करिअर सध्या पिकवर आहे. टायगर स्टार किड जरी असला तरी लहानपणी त्याला अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं आहे. त्याला पैशांच्या कडकीमुळं बेड विकावा लागला होता ज्यानंतर त्याला जमिनीवर झोपावं लागलं होतं. वाढदिवसानिमित्त टायगरच्या आयुष्यातील काही गोष्टी आपण जाणून घेणार आहोत.

टायगर श्रॉफचे वडिल प्रसिद्ध अभिनेता जॅकी श्रॉफ यांना आपण सारेच ओळखतो. त्याच्या आईचं नाव आयशा श्रॉफ आहे. एका मासिकाला दिलेल्या मुलाखीतत टायगरनं सांगितलं की, त्याची आई आयशानं एका सिनेमा प्रोड्युस केला होता. या सिनेमाचं नाव होतं बूम. अभिनेत्री कॅटरीना कैफचा हा पहिला सिनेमा होता. हा सिनेमा रिलीज होण्याआधीच लीक झाला होता. यानंतर हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर पडला. सिनेमा फ्लॉप झाल्यानं जॅकी आणि आयशाला त्यांचं ब्रादा येथील घर विकावं लागलं होतं. यानंतर ते खारमध्ये शिफ्ट झाले होते. त्यावेळी टायगर 11 वर्षांचा होता. त्याला सारं काही कळत होतं की, घरात काय चाललंय.

टायगर म्हणाला, “मला आठवतंय की, एकेक करून घरातील सर्व सामान विकावं लागत होतं. माझ्या आईच्या पेंटींग्स, लॅम्प्स, जे पाहून मी लहानाचा मोठा झाला ते सारं काही हळू हळू विकावं लागलं होतं. एक दिवस माझा बेडही विकावा लागला होता. माला माहिती होतं त्यावेळी मी काहीच करू शकणार नाही.”

टायगर जेव्हा अ‍ॅक्टर झाला तेव्हा त्यानं आपल्या आईला शब्द दिला होता की तो आपला जुना बंगला पुन्हा विकत घेईल. जॅकी आण आयशाला हे खूप आवडलं. परंतु त्यांनी याच घरात राहण्याचा निर्णय घेतला होता. गेल्या आठवड्यातच त्यानं एक नवीन घर आपल्या आई-वडिलांना गिफ्ट केलं आहे.

टायगरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर सध्या तो बागी 3 या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. हा सिनेमा 6 मार्च 2020 रोजी रिलीज होणार आहे. 2016 मध्ये आलेल्या बागी आणि 2018 मध्ये आलेल्या बागी 2 सिनेमाचा हा सिक्वल आहे. याशिवाय टायगर हॉलिवूड सिनेमा रैम्बोच्या हिंदी रिमेकमध्येही दिसणार आहे. टायगर 2014 साली आलेल्या हिरोपंती या सिनेमाच्यचा सिक्वलमध्ये म्हणजेच हिरोपंती 2 मध्येदेखील काम करताना दिसणार आहे.