BMC आयुक्तांनी भाजप नगरसेवकांचा घेतला धसका, आता सुरक्षेसाठी बाउन्सर तैनात, त्यांना पगार कोण देणार ?

मुंबई, पोलीसनामा ऑनलाईन : मुंबई महापालिका आयुक्त यांनी भाजप नगरसेवकांचा धसका घेतला आहे. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेसाठी खासगी बाउन्सर तैनात केले आहेत. ‘इगल’ कंपनीचे हे खासगी बाउन्सर असणार आहेत. हे खासगी बाउन्सर सरकारी अधिकार्‍यांच्या सुरक्षेसाठी देखील तैनात असणार आहेत, असे सांगितले जात आहे. त्यामुळे आता त्यांना पगार कोण देणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

अभिनेता सुशांत सिंह रजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी बिहार राज्यामधून आलेले आयपीएस अधिकार्‍यांना क्वारंटाइन केले. त्यानंतर भाजपच्या नगरसेवकांनी महापालिका आयुक्त इकबाल चहल यांच्या कार्यालयाबाहेर येऊन आंदोलन केले.

या आंदोलनात भाजपच्या नगरसेवाकांनी आयुक्तांना भेटण्यासाठी गोंधळ घातला. तसेच त्यांच्या कार्यालयातील दरवाज्यावर पोस्टर लावले होते. भाजप नगरसेवकांच्या आंदोलनादरन्यान ते बीएमसी आयुक्त यांच्या कर्मचार्‍यांवर ओरडले. तसेच त्यांना शिवागाळ केलीय, असा आरोप करीत महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी ट्विट केले होते.

भाजपच्या या आंदोलनानंतर आता महापालिका एकूण 18 खासगी बाउन्सर यांना सुरक्षेसाठी तैनात करत आहे. महापालिकेत खासगी सुरक्षारक्षक तैनात करण्याची ही पहिलीच घटना आहे. तर, भाजपकडून यावर टीका केली जात आहे. आता खासगी बाउन्सरची गरज का पडली?. तसेच त्यांचा पगार कोण देणार किंवा देत आहे?असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात मुंबई पोलिसांसह महापालिकेवरही विरोधकांकडून टीका केली जातेय. मुंबई पोलीस सुशांत सिंह रजपूत प्रकरणात योग्य तपास करीत नाही, असा आरोप केला जात आहे.