दिलासादायक ! एप्रिल अखेरला कोरोनापासून सुटका होणार ? ‘हा’ आहे मोदी सरकारचा प्लॅन

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना संसर्गाविरोधात मोठी लढाई लढण्याच्या तयारीत असणाऱ्या केंद्र सरकारला एप्रिल अखेर पर्यंत दिलासा मिळू शकतो.कारण, कोरोना प्रभावित क्षेत्र लॉकडाऊन सह सील करून संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. तसेच सोशल डिस्टन्सिंगच्या च्या माध्यमातून कोरोनाचा प्रभाव रोखण्यासाठी केंद्र व सर्व राज्य सरकारे यांनी तयारी केली आहे. काही तज्ज्ञांच्या मते एप्रिल महिना देशाकरिता सर्वात महत्वाचा ठरू शकतो.

यासाठी देशात १४ एप्रिल नंतर अजून दोन आठवडे आवश्यक असतील. कोरोना प्रसार रोखण्यासाठी सरकारने लागू केलेल्या लॉकडाऊन योजनेला तबलिगी समाजाने मोठा झटका दिला आहे. तर अजूनही काही राज्य तबलिगी मरकजला गेलेल्या लोकांचा शोध घेत आहे. एकीकडे कोरोना संसर्गित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना कम्युनिटी ट्रान्समिशन रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने मिळून एक योजना तयार केली आहे. त्यानुसार लॉकडाऊन कमीत कमी दोन आठवड्यांपर्यंत वाढवला जाऊ शकतो.

तीन टप्प्यात योजनेवर काम करणार

कोरोनावर मात करण्यासाठी तीन टप्प्यांमध्ये सरकारकडून योजना तयार केली आहे. यात पहिला टप्पा हा जूनपर्यंत चालेल, ज्यामध्ये कोविड-१९ हॉस्पिटल, आयसोलेशन वॉर्ड, आयसीयू, पीपीई किट ( वैयक्तिक संरक्षण उपकरणे) आणि एन-१९ मास्क तयार करण्यावर भर देण्यात येईल. यातील दुसरा टप्पा हा जुलै २०२० ते मार्च २०२१ आणि तिसरा टप्पा एप्रिल २०२१ ते मार्च २०२४ या कालावधीत असून शकतो. या काळात, केंद्र सरकारकडून राज्यांना देण्यात येत असलेल्या आपत्कालीन प्रतिसाद आणि आरोग्य प्रणाली तयारीचे पॅकेज वापरले जाईल. केंद्र सरकार कडून देण्यात येणाऱ्या या पॅकेजमुळे राज्यावरील ओझे कमी होईल.

देशाची स्थिती नाजूक

कोरोनामुळे जगात आर्थिक मंदीचे सावट निर्माण झाले आहे. याचा फटका भारताला सुद्धा बसू शकतो कारण कोरोनमुळे उद्भवणारी आर्थिक परिस्थिती व सामान्य जीवन पुन्हा सुरळीत होण्यासाठी बराच वेळ लागणार आहे. याचे दीर्घ परिणाम होतील.