Chandrahar Patil-Sangli Lok Sabha | कुस्तीच्या आखाड्यातून लोकसभेच्या मैदानात! सांगलीतून चंद्रहार पाटील लढवणार निवडणूक

सांगली : Chandrahar Patil-Sangli Lok Sabha | आगामी लोकसभा निवडणुकीत सांगली मतदारसंघातून निवडणुकीच्या (Lok Sabha Elections) मैदानात उतरण्याचा निर्णय डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी घेतला आहे. चंद्रहार पाटील यांनी सांगितले की, काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपा, शिवसेना व भारत राष्ट्र समितीसह सर्वच पक्षांकडून प्रस्ताव आला आहे. मात्र कार्यकत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ. (Chandrahar Patil-Sangli Lok Sabha)

आगामी लोकसभा निवडणूक जवळ आली असून राजकीय वातावरण तापू लागले आहे. अनेक इच्छूक उमेदवार बाशींग बांधून तयार आहेत. तर सर्वच पक्षांनी मतदार संघांची चाचपणी सुरू केली आहे. इच्छूक उमेदवारांनी मतदार संघातून कार्यक्रम आणि गाठीभेटी सुरू केल्या आहेत. (Chandrahar Patil-Sangli Lok Sabha)

सांगली लोकसभा मतदार संघात भाजपकडून सध्याचे विद्यमान खासदार संजय पाटील व माजी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, तसेच काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील या तिघांच्या नावाची चर्चा आहे. आज चौथे नाव समोर आले ते म्हणजे पैलवान चंद्रहार पाटील यांचे.

चंद्रहार पाटील यांनी आज पत्रकारांना सांगितले की, सांगली लोकसभा मतदारसंघातून मी निवडणूक लढवणार
असून कार्यकत्र्यांशी चर्चा करून योग्य पक्षाची निवड करणार आहे. यामुळे येथील आगामी लोकसभा निवडणुक
रंगण्याची शक्यता आहे.

दरम्यान, हिंदकेसरी पैलवान मारुती माने हे १९८५ मध्ये राज्यसभेचे खासदार होते. आता सांगली लोकसभा मतदार
संघातून डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील निवडणूक लढवणार आहेत. ते विजयी झाले तर दिल्लीच्या
संसदेत येथून जाणाऱ्या आणखी एका पैलवानाची नोंद होणार आहे. चंद्रहार पाटील यांनी निवडणुकीसाठी कामाला
सुरूवात केली असून लवकरच ते लवकरच मतदार संघात एक लाख बाटल्या रक्त संकलन करण्याचा उपक्रम
राबवणार आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | कात्रज परिसरातील चामुंडामाता मंदिरातील दागिने चोरणार्‍याला भारती विद्यापीठ पोलिसांकडून अटक, 2 लाख 60 हजाराचा ऐवज जप्त (Video)

Ajit Pawar Meeting With Former Corporator In Pune | अजित पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेवकांची बैठक, पण धक्का मात्र भाजपच्या माजी नगरसेवकांना

Uddhav Thackeray On Devendra Fadnavis | उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना जोरदार टोला, म्हणाले – ”हे म्हणजे बॉम्बस्फोटाच्यावेळी दाऊद भाजपाचा…”

Raj Thackeray On FSI In Pune | पुणे शहरात एफएसआयचा सुळसुळाट झालाय पण रस्ते कुठे आहेत? (Video)