‘चंद्रपूर’ गडचांदूर ‘नगरपरिषदेत’ काँग्रेस-राष्ट्रवादीला ‘यश’, नगराध्यक्षपदी काँग्रेसच्या सविता टेकाम

चंद्रपूर : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात महाविकासआघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर आता महाविकासआघाडीला अनेक नगरपरिषदेत यश मिळताना दिसत आहे. त्याचा परिणाम आणि पुनरावृत्ती म्हणून काँग्रेसने चंद्रपूर गडचांदूरची नगरपरिषद राखली आहे. या नगरपरिषदेत भाजपला मोठा पराभव स्वीकारावा लागला आहे. त्यामुळे चंद्रपूर गडचांदूर नगरपरिषदेतून भाजपची पिछेहाट झाली आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादीसाठी हा विजय मोठा मानला जात आहे. नगरपरिषदेच्या नगराध्यपक्ष पदाच्या निवडणूकीत काँग्रेसच्या उमेदवार सविता टेकाम जवळपास 1,500 मतांनी विजयी झाल्या आहेत. चंद्रपूरात महानगरपालिकेच्या पोटनिवडणूकीत ज्याप्रमाणे भाजपला धक्का बसला त्याच प्रमाणे नगरपरिषदेत देखील भाजपची पिछेहाट झाली आहे.

चंद्रपूर गडचांदूर नगरपरिषदेतच्या निवडणूकीत शिवसेना पहिल्यांदाच उतरली होती. यात शिवसेनेला पहिल्यांच निवडणूकीत चांगले यश मिळाले आहे. शिवसेनेला या नगरपरिषदेत जवळपास 5 जागांवर विजय मिळाला आहे. तर काँग्रेस-राष्ट्रवादीला 9 जागांवर विजय मिळवता आला आहे. नगरपरिषदेच्या निवडणूकीत चांगले यश मिळाल्याने काँग्रेस-राष्ट्रवादीसाठी हा मोठी बाब मानली जात आहे. राष्ट्रवादी नगरपरिषदेत आपली ताकद वाढवू पाहत आहेत.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/