Chandrasekhar Bawankule | ‘विरोधात बातम्या न देण्यासाठी पत्रकारांना ढाब्यावर न्या…’, व्हायरल क्लिपवर बावनकुळेंची सारवासारव (व्हिडिओ)

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – Chandrasekhar Bawankule | आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली असताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी पदाधिकारी यांना दिलेल्या अजब सल्ल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. विरोधात बातम्या न देण्यासाठी पत्रकारांना ढाब्यावर न्या… असा सल्ला बावनकुळे यांनी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत दिला. याची एक कथित ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होत आहे. यावरुन विरोधकांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर टीका केली आहे. यानंतर बावनकुळे यांनी नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलताना सारवासारव केली आहे.

बावनकुळे यांच्याकडून सारवासारव म्हणाले…

आपण एवढे चांगले काम करतो, मोदींनी गेल्या 9 वर्षात इतके चांगले काम केले. भारताचे चंद्रयान 3 मुळे वैज्ञानिकांनी इतकं मोठं जागतिक यश मिळवले. देशात महिला आरक्षण लागू झाले तरीही नकारात्मक बातम्या येतात. त्यामुळे पत्रकारांसोबत बसा, त्यांचा सन्मान करा. तुम्ही त्यांच्याकडे चहा घ्यायला जा, किंवा त्यांना तुमच्याकडे चहाला बोलवा. खरी वस्तूस्थिती त्यांना सांगा. पत्रकारांना खरे सांगणे, पत्रकारांना समजावून सांगणे काय खरे आहे काय खोटे आहे. पत्रकारांना इनपुट देणे, कारण पत्रकारांकडून समाजातील सत्य समजते. त्यामुळे पत्रकारांना सन्मान देऊन त्यांच्यासोबत चांगले वागा असं त्यांनी म्हटलं. (Chandrasekhar Bawankule)

https://x.com/cbawankule/status/1706162942444761308?s=20

तसेच बूथवर जे पदाधिकाऱ्यांना दिलेत, त्या बूथवर लोकांचे काय म्हणणे आहे,
पत्रकार इतके महत्त्वाचे असतात की ते समाजाचे मत आणि मन बदलू शकतात. शेवटी पत्रकारही एक मतदार आहे.
त्याला मत मांडण्याकरता काय अडचण आहे. त्यांच्याशी सापत्न वागणूक कशाला? तुम्ही बोलतच नाही.
पत्रकारांना विचारणार नाही. त्यांचे मत जाणून घेणार नाही.
समाजात काय सुरू आहे ते विचारात घेणार नाही का.. म्हणून मी याप्रकारचा सल्ला दिला. त्यात कुठलेही वाईट वक्तव्य नव्हते. काल मी नगरमध्ये पत्रकार परिषद संपल्यावर पत्रकारांना म्हटलं तुम्ही चहा घ्यायला चला यात काय वाईट आहे का? त्यामुळे हे चुकीचे आहे असा खुलासा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ganpati Immersion 2023 | पुण्यातील प्रमुख गणपती मंडळे सायंकाळी 6 नंतर विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणार (व्हिडिओ)

Ajit Pawar On Eknath Khadse | ‘…तर मी डायरेक्ट विचारेन, मला मध्यस्थी लागत नाही’, एकनाथ खडसेंच्या विधानावर अजित पवारांचे सडेतोड उत्तर

Chandrashekhar Bawankule | ‘पत्रकारांना चहा पाजा, धाब्यावर न्या’ बावनकुळेंच्या विधानाची क्लिप व्हायरल, विरोधकांनी उठवली टीकेची झोड

Case filed against Chief of Samast Hindu Aghadi Milind Ekbote | समस्त हिंदु आघाडीचे अध्यक्ष मिलींद एकबोटे, पुण्येश्वर पुननिर्माण समितीचे कुणाल कांबळे यांच्यावर गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?

Policeman Dies In Accident In Pune | अपघातात जखमी झालेल्या पोलीस हवालदाराचे निधन,
पुणे ग्रामीण पोलीस दलात ‘स्टाईल आयकॉन’ म्हणून होती ओळख