मुलाला पळवून नेणारा ‘जादूगर’ पोलिसांच्या ‘जाळ्यात’

उस्मानाबाद/कळंब : पोलीसनामा ऑनलाइन – जादूगरीचे खेळ दाखणाऱ्या एका व्यक्तीने 13 वर्षाच्या मुलाला पळवून नेल्याची घटना उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब येथे घडली होती. कळंब पोलिसांनी मुलाची बारामती तालुक्यातील लिमटेक येथून सुटाका करुन जादूगाराला अटक केली. संकेत अशोक शेळके (वय-13) असे पळवून नेलेल्या मुलाचे नाव आहे. तर महादेव जनार्दन टिंगरे असे अटक करण्यात आलेल्या जादूगाराचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महादेव टिंगरे हा जादूचे खेळ दाखवतो. त्याने कंळंब येथून संकेत याला फूस लावून पळवून नेले. मुलगा बेपत्ता झाल्याने त्याच्या नातेवाईकांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला मात्र, तो सापडला नसल्याने कळंब पोलीस ठाण्यात मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी संकेतचा शोध सुरु केला. तसेच संकेतचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल करून मुलाबाबत काही माहित असल्यास पोलीस ठाण्यात संपर्क साधण्याचे आवाहन केले होते.

दरम्यान, एका व्यक्तीने कळंब पोलिसांसाडे संपर्क साधून संकेत हा बारामती तालुक्यातील लिमटेक येथे असल्याची माहिती पोलिसांना दिली. कळंब पोलिसांनी बारामती पोलिसांच्या मदतीने लिमटेक येथे जाऊन संकेतची सुटका करून आरोपी टिंगरे याला अटक केली. ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक अशोक पवार, पोलीस नाईक गणेश वाघमोडे, अनिल तांबडे यांच्या पथकाने केली.

Visit : Policenama.com