काँग्रेसनं शिवसेनेला करून दिली ‘ही’ आठवण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आपला देश हा संविधानावर चालतो आणि आपल्या देशाचे संविधान समानतेवर आधारित आहे. त्यामुळे राज्यसभेत नागरिकत्व विधेयकावर मतदान करताना शिवसेना संविधानातील या गोष्टी लक्षात ठेवेल ही आशा आहे, असे सांगत काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी शिवसेनेला संविधानाची आठवण करून दिली. महाराष्ट्रात काँग्रेस आणि शिवसेना सत्तेत आले असून 15 दिवस झाले असतानाच काँग्रेसने शिवसेनेला सल्ला देण्यास सुरुवात केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

लोकसभेत नागरिकत्व दुरुस्ती विधेयक सोमवारी मंजूर करण्यात आले. याला शिवसेनेने पाठिंबा देत विधेयकाच्या बाजूने मतदान केले होते. त्यानंतर राज्यसभेत हे विधेयक मांडण्यापूर्वी शिवसेना या विधेयकाला विरोध करणार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे शिवसेना राज्यसभेत विधेयकाविरोधात मतदान करेल असे बोलले जात होतं. त्याच दरम्यान शिवसेना राज्यसभेत मतदानावेळी सभात्याग करणार असल्याच्या बातम्या आल्या होत्या.

शिवसेनेने सभात्याग केल्यास एकप्रकारे भाजपलाच मदत होणार असल्याने काँग्रेस शिवसेनेवर नाराजी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर बाळासाहेब थोरात यांनी केलेले वक्तव्य महत्त्वाचे मानले जात आहे. आपलं संविधान समानतेवर आधारित आहे. आपण सर्वजण समानतेचे पुरस्कर्ते आहोत. त्याची नोंद शिवसेनेने घेऊन राज्यसभेत या विधेयकाविरोधात मतदान करावे, अशी अपेक्षा थोरात यांनी व्यक्त केली आहे.

फेसबुक पेज ला लाईक करा : https://www.facebook.com/policenama/