नांदेडमध्ये १०० टक्के काँग्रेसच जिंकणार अन् राज्यात २४ ते २५ जागा आघाडीला मिळणार : अशोक चव्हाण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – लोकसभा निवडणुकीसाठी शेवटच्या टप्प्यातील मतदान आज (रविवार) पार पडले. त्यानंतर वृत्‍तवाहिन्यांनी एक्झिट पोलवर जाहिर केले. एक्झिट पोलवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली असुन त्यांनी नांदेडमध्ये १०० टक्के काँग्रेसच निवडुन येणार असुन राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला २४ ते २५ जागा मिळणार असल्याचा अंदाज व्यक्‍त केला आहे.

एक्झिट पोल हे केवळ अंदाज आहेत. खरी परिस्थिती मतमोजणी नंतर स्पष्ट होणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. एक्झिट पोलसाठी किती जणांची मतं जाणून घेतली जातात, किती लोकांना विचारण्यात येते त्यावर हे सर्व अवलंबून आहे असेही ते यावेळी म्हणाले. राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आणि मित्र पक्षांना एकुण २४ ते २५ जागा मिळतील असा अंदाज देखील त्यांनी व्यक्‍त केला. देशात एनडीएचे सरकार येणार नसुन परिवर्तन होणार असल्याचा अंदाज त्यांनी सांगितला. देशात काँग्रेस आणि घटक पक्षाला किती जागा मिळतात यावर इतर सर्व गोष्टी अवलंबुन असल्याचेही ते म्हणाले. एकंदरीत एक्झिट पोलचे केवळ अंदाज असतात. मात्र, नांदेडमध्ये १०० टक्के काँग्रेसच जिंकणार असल्याचा दावा यावेळी अशोक चव्हाण यांनी केला आहे.