शरद पवारांनी अखेर ‘मरकज’च्या घटनेवर दिली ‘ही’ पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – दिल्लीतील निझामुद्दीन भागातील ‘मरकज’ मधील ‘तबलिगी जमात’ यांच्या झालेल्या कार्यक्रमावर शरद पवारांनी अखेर मौन सोडलं आहे. दिल्ली मधील अत्यंत दाटीवाटीच्या निजामुद्दीन परिसरात तबलिगी जमातचा झालेला सोहळा टाळता आला असता मात्र तसे घडलं नाही.त्याचा परिणाम संपूर्ण देशाला भोगावा लागत आहे. मात्र अनेक ठिकाणी अजूनही सार्वजनिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असल्याचे दिसून आले आहे. असं महाराष्ट्रात घडू नये असे आवाहन राष्ट्रवादीचे काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी फेसबुक च्या माध्यमातून जनतेला केल.

कोरोना संसर्गच्या पार्श्वभूमीवर आज तिसऱ्यांदा शरद पवारांनी फेसबुक च्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. येत्या १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती बाबत त्यांनी भाष्य केलं. एरवी आपण बाबासाहेबांच्या जयंतीचे कार्यक्रम महिनाभर करत असतो मात्र यंदा कोरोनच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम पुढे नेता येईल का याबाबत जाणकारांनी विचार करावा. तसेच मरकजच्या कार्यक्रमास हजारो लोक जमले होते व तिथे परदेशी नागरिकांनी देखील हजेरी लावल्याने काही जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे नाकारता येत नाही असेही ते म्हणाले.

आधीच देशात कोरोना संसर्गित लोकांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे सर्वानी मिळून आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घेणं आवश्यक आहे. तसेच महाराष्ट्रात असे प्रकार घडणार याची काळजी सर्वानी घ्यायला हवी. दरम्यान, लॉक डाऊन च्या काळात बाहेर न पडता पोलीस व प्रशासनाला सहकार्य करावे. मिळालेल्या या दिवसांमध्ये वाचन संस्कृतीला वाव द्यावा. याशिवाय तुमचा आवडता छंद जोपासा असे शरद पवारांनी सांगितलं.