Covid-19 : सॅनिटायझर लावलेल्या हातांनी खाणं सुरक्षित की असुरक्षित ? ‘ही’ वापरण्याची योग्य पद्धत

पोलीसनामा ऑनलाईन टीम : सध्याच्या कोरोनाच्या काळात लोकांचं सॅनिटायझर वापरण्याचं प्रमाण वाढलं आहे. कोरोनाच्या भीतीनं अनेकजण वारंवार सॅनिटायझरचा वापर करत आहेत. कारण यासाठी पाण्याचीही गरज नसते. परंतु याच्या वापराची योग्य पद्धत अनेकांना माहित नाही. सॅनिटायझर घेतानाच नीट पडताळणी करून घ्यायला हवं. यात अल्कोहोल इथाईल किंवा आईसप्रोपाईल असलं पाहिजे हे लक्षात असू द्या. आज आपण सॅनिटायझर वापरण्याची योग्य पद्धत सॅनिटायझर लावण्याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत.

सॅनिटायझर लावल्यानंतर किती वेळानं खावं ?
काही लोक सॅनिटायझर लावल्यानंतर त्यात हातानं लगेच खायला सुरुवात करतात. परंतु असं करणं आरोग्यासाठी घातक ठरू शकतं. कारण यामुळं मूत्रपिंड, यकृत आणि हृदयाला हानि पोहोचू शकते. कारण यात अल्कोहोलचं प्रमाण जास्त असतं. सॅनिटायझर लावल्यानंतर किमान 20 सेकंदांनंतर खाण्यास सुरुवात करा. कारण तुमच्या हातांवरील अल्कोहोल उडून जाण्यास एवढा वेळ पुरेसा आहे. म्हणूनच सॅनिटायझर लावल्यानंतर 10 ते 12 सेकंद हात चोळत राहिलं पाहिजेत.

सॅनिटायजर लावल्यानंतर किती वेळ हात सुरक्षित राहतो ?
हा प्रश्न सर्वांनाच पडला असेल. डॉक्टर सांगतात की, जेव्हा तुम्ही सॅनिटायझर लावता तेव्हा तुमच्या हातांवर असणारे सर्व जीवाणू आणि विषाणू नष्ट होतात. मात्र सॅनिटायजरचा वापर केल्यानंतर 20 सेकंदांनी तुम्ही पुन्हा जर एखाद्या वस्तूला हात लावला तर तुम्हाला पुन्हा हात स्वच्छ करून घ्यावे लागतील. परंतु वारंवार सॅनिटायझर वापरणंही चांगलं नाहीये. हात धुणं हा याला चांगला पर्याय आहे.

सॅनिटायजरचा वापर करताना पुढील 10 गोष्टींवर आवर्जून लक्ष द्या
1) सॅनिटायझर हे कायम स्वच्छ हातांवरच वापरावं.

2) सॅनिटायझरमध्ये 60 ते 70 टक्के इथाईल किंवा आईसप्रोपाईल अल्कोहोल आहे याची खात्री करून घ्या.

3) हात स्वच्छ करताना WHO मार्गदर्शक सूचनांकडेही लक्ष असू द्या.

4) किमान 15 ते 20 सेकंद हात धुवा. हाताच्या सर्व भागांकडे सॅनिटायझर पोहोचेल याकडे लक्ष असू द्या.

5) हातांच्या स्वच्छतेसाठी फक्त हँड सॅनिटायझरलाच प्राधान्य देताय असं नको व्हायला.

6) स्वच्छ पाण्यानं हात धुतल्यानंतर पुन्हा सॅनिटायझरचा वापर करू नका.

7) सॅनिटायझरच्या प्रमाणाकडेही लक्ष असू द्या.

8) चेहऱ्यावर चुकूनही सॅनिटायझरचा वापर करू नका.

9) जिथे हाथ धुण्याची व्यवस्था नाही अशाच ठिकाणी सॅनिटायझरचा वापर करा.

10) सॅनिटायझरपेक्षाही साबण आणि पाण्यानं हात धुणं जास्त प्रभावी ठरू शकतं. त्यामुळं गरजेनुसारच याचा वापर करावा.