Coronavirus : दिलासादायक ! राज्यात ‘कोरोना’तून बरे होण्याच्या प्रमाणात लक्षणीय वाढ, गेल्या 24 तासात 9926 रूग्ण ‘तंदुरूस्त’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात आजही कोरोनाच्या नव्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे. आज दिवसभरात 9926 रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत राज्यात 2 लाख 76 हजार 809 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याने दिलासा मिळत आहे.राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 62.74 टक्के इतके झाले आहे.

राज्यात रुग्ण बरे होत असताना राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा देखील वाढत आहे. गेल्या 24 तासात राज्यामध्ये 9509 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 4 लाख 41 हजार 228 इतकी झाली आहे. राज्यात रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण 19.56 टक्के इतके आहे. याच वेळी राज्यात 260 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यातील आतापर्यंत 15 हजार 576 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

राज्यातील मृत्यू दर 3.53 इतका आहे. सध्या राज्यात 1 लाख 48 हजार 537 रुग्ण अॅक्टिव आहेत. या रुग्णांमध्ये 44 हजार 204 रुग्ण हे पुणे जिल्ह्यातील आहे. या रुग्णावर उपचार सुरु आहेत. आजपर्यंत 22 लाख 55 हजार 701 प्रयोगशाळा चाचण्या घेण्यात आल्या आहेत. राज्यात 9 लाख 25 हजार 269 रुग्ण होम क्वारंटाईन आहेत. तर 37 हजार 944 रुग्ण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.