दक्षिण अफ्रिकेविरूध्द शतक ठोकून ‘हिटमॅन’ रोहित शर्मानं केली डॉन ब्रॅडमनची बरोबरी, तोडले अनेक रेकॉर्ड

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर रोहित शर्मा याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दमदार सुरुवात करत शानदार शतक झळकावले आहे. वर्ल्डकप स्पर्धेत शानदार फॉर्ममध्ये असलेल्या रोहित शर्मा याने पाच शतके झळकावून सर्वांना धक्का दिला होता. त्यामुळे त्याच्या या कामगिरीच्या जोरावर त्याला निवड समितीने कसोटी संघात देखील सलामीला खेळण्याची संधी दिली.

नऊ त्याने हि संधी सार्थ ठरवत  शानदार शतकी खेळी केली. रोहित शर्मा याने त्याच्या या शतकी खेळीत 10 चौकार आणि 4 षटकारांची आतिषबाजी केली. त्याने  154 चेंडूंमध्ये हे शतक झळकावत आपले तिसरे कसोटी शतक पूर्ण केले.तसेच या शतकाबरोबरच त्याने महान फलंदाज डॉन ब्रॅडमन याच्या विक्रमाशी बरोबरी देखील केली.

india vs south africa, 1st test, rohit sharma, rohit sharma century, rohit sharma 100, रोहित शर्मा, भारत वस साउथ अफ्रीका, क्रिकेट, खेल, रोहित शर्मा शतक, विशाखापत्तनम टेस्ट, रोहित शर्मा प्रेस कांफ्रेंस, rohit sharma press conference

ब्रॅडमनशी केली बरोबरी
पहिल्याच कसोटी सामन्यात शतक झळकावणाऱ्या रोहित शर्मा याची भारतीय मैदानावर कसोटी सरासरी आता 98.22 झाली असून संपूर्ण कारकिर्दीत आपली कसोटी सरासरी 99.9 असणाऱ्या डॉन ब्रॅडमन यांची देखील घरच्या मैदानावर सरासरी इतकीच होती. रोहित शर्मा याने भारतात आतापर्यंत १० कसोटी सामने खेळले सून यामध्ये 4 शतके आणि 5 अर्धशतकांच्या साहाय्याने त्याने  884 धावा केल्या आहेत.

तीनही प्रकारात शतक झळकावणारा पहिला भारतीय  सलामी फलंदाज
आजच्या शतकानंतर क्रिकेटच्या तीनही प्रकारात शतक झळकावणारा रोहित शर्मा हा पहिला भारतीय सलामी फलंदाज ठरला आहे. याआधी शिखर धवन, पृथ्वी शॉ  आणि के. एल. राहुल यांनी सलामी फलंदाज म्हणून कसोटी शतक साजरे केले आहे. त्याचबरोबर कसोटी चॅम्पियनशिपमध्ये स्पर्धेत शतक झळकावणारा देखील तो पहिलाच भारतीय सलामी फलंदाज ठरला आहे.



2 ऑक्टोबर रोहितची खास

2 ऑक्टोबर हा दिवस त्याच्यासाठी खास असून 2ऑक्टोबर 2015 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याने पहिले  टी-20 शतक झळकावले होते. त्यानंतर आता 2 ऑक्टोबर रोजी त्याने सलामीवीर म्हणून कसोटी शतक झळकावले आहे. तसेच या सामन्यात त्याने भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविड याचा घरच्या मैदानावर सलग अर्धशतके झळकावण्याच्या विक्रमाशी देखील बरोबरी केली आहे. राहुल द्रविड याने घरच्या मैदानावर  6 पेक्षा अधिक वेळा 50 आणि त्यापेक्षा अधिक धावा करण्याचा विक्रम केला आहे.

Visit : Policenama.com