विश्‍वकप विजेते कर्णधार कपिल देव यांच्यावर ‘हे’ गंभीर आरोप, क्रिकेट सल्‍लागार समितीचा दिला राजीनामा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय संघाचा माजी कर्णधार कपिल देव हा नवीन वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. एकापेक्षा जास्त लाभाच्या पदांमुळे अडचणीत आलेल्या कपिल देव यांनी क्रिकेट सल्लागार समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. याआधी सदस्य शांता रंगास्वामी यांनी देखील या समितीच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे. क्रिकेट मंडळात विविध लाभाची पदे घेतल्याचा आरोप केल्यानांतर आता त्यांनी राजीनामा दिला आहे. बीसीसीआयचे एथिक्स ऑफिसर डीके जैन यांनी मध्यप्रदेश क्रिकेट संघटनेचे सदस्य संजीव गुप्ता यांच्या तक्रारीनंतर दोघांना यावर नोटीस देत स्पष्टीकरण मागितले होते.

जागतिक क्रिकेटमध्ये सर्वात उत्तम अष्टपैलू खेळाडू राहिलेल्या कपिल देव यांनी प्रशासकीय समितीचे अध्यक्ष विनोद राय आणि बीसीसीआयचे सीईओ राहुल जौहरी यांना मेल द्वारे आपला राजीनामा सादर केला. यामध्ये त्यांनी लिहिले कि, सल्लागार समितीचा अध्यक्ष असणे खूपच सुखद काम होते. तसेच मुख्य प्रशिक्षक निवडीच्या वेळेस खूप चांगला अनुभव आला. या समितीत कपिल देव यांच्याबरोबरच शांता रंगास्वामी आणि अंशुमान गायकवाड या दोन सदस्यांचा देखील समावेश होता. मात्र आता त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने त्यांना कोणत्याही नोटिशीला उत्तर देणे गरजेचे नाही.

यामुळे मिळाली होती नोटीस
कपिल देव आणि शांता रंगास्वामी यांनी राजीनामा दिला असला तरी तिसरे सदस्य अंशुमन गायकवाड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला नाही. त्यामुळे त्यांना डीके जैन यांच्या नोटिशीला उत्तर द्यावे लागणार आहे. शांता रंगास्वामी आणि कपिल देव हे इंडियन क्रिकेटर्स एसो‌सिएशनच्या सदस्यांमध्ये देखील असल्याने त्यांना एकापेक्षा अधिक लाभाचे पद घेता येणार नसल्याने त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला.

Visit : Policenama.com