‘सायबर’ व ‘तांत्रीक’ गुन्ह्यांसाठी ‘बिनतारी’ विभागाचे योगदान महत्त्वाचे : डॉ. के. वेंकटेशम

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – बिनतारी विभाग हा कायदा व सुव्यवस्था स्थापन करण्यामधील पदडद्यामागचा विभाग आहे. सायबर व तांत्रीक गुन्ह्यांमधील बिनतारी विभागाचे भविष्यातील योगदान महत्त्वाचे असल्याचे सांगत दररोज होणाऱ्या तंत्रज्ञान बदलाला सामोरे जाण्यासाठी नवीन तंत्रज्ञान अवगत करण्याचे आवाहन प्रशिक्षणार्थींना पुणे पोलीस आयुक्त के. वेंकटेशम यांनी केले आहे.

पोलीस बिनतारी संदेश विभागाच्या एकूण 206 तांत्रिक सहाय्यक पोलीस उप निरीक्षक, हेड कॉंन्स्टेबल व कॉंस्टेबल पदाच्या प्रशिक्षणार्थींचा दिक्षांत संचलन आज बिनतारी संदेश विभागाच्या पुणे मुख्यालयात पार पडले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून पोलीस आयुक्त के. वेंकटेशम उपस्थित होते. यावेळी त्यांनी आपल्या मनोगतामध्ये प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले. यावेळी बिनतारी संदेश विभागाचे संचालक रितेश कुमार, बिनतारी संदेश विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक राजेंद्र डहाळे, पोलीस उप अधीक्षक प्रशिक्षण केंद्र अनिल भोपे आणि बिनतारी संदेश विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी प्रशिक्षणार्थीं यांच्यावतीने पोलीस आयुक्त के. वेंकटेशम यांना मानवंदना देण्यात आली.

बिनतारी संदेश विभागाचे संचालक रितेश कुमार यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले, महाराष्ट्र राज्य बिनतारी विभागाला देशातील एक अग्रगण्य विभाग बनवायचा आहे. त्यामुळे देशातील प्रशिक्षणार्थींना एकाचवेळी प्रशिक्षण देण्यासाठी सुसज्ज प्रशिक्षण केंद्र बिनतारी मुख्यालयात उभारण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच बिनतारी मुख्यालयात विविध विभाग उभारण्याच्या वेळी कठोर परिश्रम घेतलेल्या सर्व प्रशिक्षणार्थींचे कौतूक केले.

फेसबुक पेज लाईक करा – 

You might also like