Cylinder Blast | अहमदाबादमध्ये सिलिंडरच्या स्फोटात 7 जणांचा मृत्यू; मृतांमध्ये लहान मुले, महिलांचा समावेश

नवी दिल्ली : वृत्त संस्था – Cylinder Blast | गुजरातच्या (Gujarat) अहमदाबाद (Ahmedabad) मधील एका कारखान्यात मंगळवारी रात्री एलपीजी सिलिंडरचा (LPG Cylinder) भीषण स्फोट (Explosion) झाला. यामध्ये सात जणांचा मृत्यू (Death) झाला आहे. तर तीन जण जखमी आहेत मृतांमध्ये लहान मुले व महिलांचाही समावेश आहे. जखमींना उपचारासाठी   रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या संदर्भात अहमदाबाद ग्रामीणच्या (Ahmedabad Rural) असलाली पोलीस ठाण्याचे एस.एस. गामेटी (S.S. Gameti) यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री एका कारखान्यात काही कामगार काम करीत होते व त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्य हे एका खोलीत झोपले होते तेव्हा एलपीजीची गळती सुरू झाली.

ही बाब ज्यावेळी शेजारील लोकांना समजली त्यावेळी त्यांनी दार वाजवून सतर्क केले. त्यावेळी कामगारांनी दिवा लावला. त्यातून स्फोट होऊन आणखी मोठी दुर्घटना घडली. त्यावेळी तेथे दहा जण झोपलेले होते. त्यापैकी अनेक जण गंभीर भाजले. तीन जणांचा उपचारावेळी गुरुवारीच मृत्यू झाला होता. शुक्रवारी जखमींपैकी इतर चार जणांचा मृत्यू (Death) झाला. तर अन्य काही जणांवर उपचार (Treatment) सुरू आहे. या बाबतचे वृत्त एका हिंदी वेबसाइटने दिले आहे.

बंदुकीसोबत सेल्फी काढणं पडलं महागात, नवविवाहितेचा मृत्यू पण माहेरच्यांनी केला धक्कादायक खुलासा
उत्तर प्रदेशच्या ( Uttar Pradesh) हरदोईमध्ये एका महिलेला बंदुकी सोबत सेल्फी काढणे चांगलेच महागात पडलं आहे. या महिलेला आपला जीव गमवावा लागला मात्र मुलीकडील लोकांनी याबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. त्यांनी आपल्या मुलीचा हुंड्यासाठी छळ केल्याचे म्हंटले आहे. सासरी तिला दोन लाखांसाठी तिला खूप त्रास दिला असल्याचेही त्यांनी सांगितले. मुलीचा मृतदेह ताब्यात घेऊन पोलिसांनी तो शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

याप्रकरणी तरुणीचे वडील राकेश कुमार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार मुलीचा पती आकाश आणि सासू-सासरे यांच्या विरोधात हुंड्यासाठी २ लाख रुपये मागून अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
दोन महिन्यांपूर्वी राधिका हिच्यासोबत आकाश गुप्ता याचं लग्न झालं होतं.
साधारण 2 वाजेदरम्यान राधिका बंदुकीसह सेल्फी घेत असताना अचानक गोळी झाडली गेली आणि यात राधिकाचा मृत्यू झाला.
यानंतर कुटुंबीयांनी तिला तातडीने रुग्णालयात नेलं. तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.
राधिकाच्या गळ्याच्या आरपार बंदुकीची गोळी गेली होती. पोलिसांनाही याबाबत कळवण्यात आले होते.
दरम्यान पोलिसांनी तपासासाठी राधिकाचा मोबाईल जप्त केला आहे.

Web Title : cylinder blast gujarat 7 killed lpg cylinder explosion gujarat three serious injured

बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूची विजयी सुरुवात;
टोकिओ ऑलपिंकमध्ये पहिल्या सामन्यात सहज केली मात

Income Tax | प्राप्तीकर विभागाचा दावा,
दैनिक भास्कर ग्रुपने केली 700 कोटी रुपयांच्या टॅक्सची ‘चोरी’

NIV Pune Recruitment-2021 | नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी पुणे येथे नोकरीची सुवर्णसंधी, जाणून घ्या सविस्तर

Mukesh Ambani | चीन आणि अमेरिका इतका श्रीमंत होईल India,
जाणून घ्या मुकेश अंबानी यांनी का केले ‘हे’ वक्तव्य

Supreme Court | पालकांना मोठा दिलासा ! शैक्षणिक शुल्कात 15 % कपात,
शुल्क वाढीबद्दल राज्य सरकारला निर्देश