लोकल ट्रेन सर्वांसाठी केव्हा सुरू होईल ? ठाकरे सरकारकडून महत्वाचे संकेत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –  मार्च महिन्यात सरकारने लॉकडाऊन ( Lockdown) जाहीर केल्यानंतर सरकारने सर्व प्रकारच्या सरकारी परिवहन सेवा बंद ठेवल्या होत्या. यामध्ये मुंबई लोकलचा ( Local) देखील समावेश आहे. त्यानंतर आता काही दिवसांपूर्वी सरकारने लोकलमधून महिलांना प्रवास कमी करण्याची मुभा नुकतीच देण्यात आली. मात्र इतर मुंबईकरांना अजुनही लोकल प्रवासाची परवानगी मिळालेली नाही. त्यामुळे लाखो मुंबईकर बस आणि इतर साधनांनी प्रवास करत आहेत. पण बसची संख्या कमी असल्याने मुंबईकरांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे आता सर्वसामान्य नागरिकांना लोकलमधून प्रवास करण्याची परवानगी देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.त्यानंतर याबद्दल मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार ( Vijay Vadettiwar) यांनी महत्वाची माहिती दिली आहे.

याविषयी माहिती देताना अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसोबतच सर्वसामान्यांना नागरिकांना लोकलमधून प्रवास करण्याचा निर्णय पुढील २-३ दिवस घेण्यात येणार असायची माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. राज्य सरकार आणि रेल्वे प्रशासनाकडून लवकरच लोकल प्रवासाबद्दल निर्णय घेतला जाईल, असं ते पुढे म्हणाले. त्यामुळे लवकरच मुंबईकरांना लोकलमधून प्रवास करण्याची परवानगी देण्यात येईल, अशी शक्यता दिसत आहे. या विषयासाठी काल वडेट्टीवारांनी राज्य सरकारमधील अधिकारी आणि रेल्वे प्रशासनातल्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर बोलताना वडेट्टीवारांनी लोकल सेवा सर्वसामान्यांसाठी लवकरच सुरू होईल, असे संकेत दिले.त्यामुळे लवकरच मुंबईकर लोकलमधून प्रवास करू शकणार असल्याचे देखील त्यांनी यावेळी म्हटले.

दरम्यान, राज्य सरकारने लोकल सेवा सुरु केल्यानंतर मागील मंगळवारपर्यंत केवळ अत्यावश्यक सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांनाच लोकलमधून प्रवास करण्याची परवानगी होती. पण बुधवारपासून देखील महिलांना लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली. त्यासाठी वेळ निश्चित करून देण्यात आली आहे. सकाळी ११ ते दुपारी ३ आणि संध्याकाळी ७ ते शेवटच्या लोकलपर्यंत महिला या लोकलमधून प्रवास करू शकणार आहेत.