धक्कादायक ! दिल्लीतील मोहल्ला ‘क्लिनिक’चा डॉक्टर ‘कोरोना’बाधित

1000 रुग्णांवर केले होते उपचार

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – दिल्लीतील एका मोहल्ला क्लिनिकमध्ये उपचार करणारे डॉक्टर कोरोनाबाधित असल्याचे बुधवारी स्पष्ट झाले आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. त्यांनी मागील आठ दिवसात तब्बल 1 हजार रुग्णांवर उपचार केले होते. ही घटना उत्तर पूर्व दिल्लीतील मौजपूर परिसरातील मोहनपूरी येथील आहे.

दिल्लीत आतापर्यंत 31 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. देशातील कोरोनाबाधितांची संख्या आता 606 पर्यंत पोहचली आहे.  दिल्लीतील मोहल्ला क्लिनिकमध्ये दररोज साधारण 150 ते 200 रुग्ण उपचार घेण्यासाठी येतात. मोहनपूरी येथील डॉक्टरांनी 12 ते 18 मार्च दरम्यान या मोहल्ला क्लिनिकमध्ये रुग्णांवर उपचार केले होते. या सहा दिवसात जवळपास 1 हजार रुग्णांनी या क्लिनिकवर उपचार घेतले असल्याची शक्यता आहे.

हे रुग्ण असल्याने त्यांना कोरोना संक्रमित होण्याचा मोठा धोका आहे. आम आदमी पार्टीने या क्लिनिकवर एक नोटीस लावली आहे त्यात डॉक्टर… मोहल्ला क्लिनिक मौजपूर दिल्ली हे कोरोना विषाणूने बाधित झाले आहेत. ज्या रुग्णांनी 12 ते 18 मार्च दरम्यान त्यांच्याकडून उपचार करुन घेतले असतील, त्यांनी पुढील 15 दिवस स्वत:ला होम क्वारंटाइन करावे़ अगर कोरोना विषाणूचे लक्षण दिसून आले तर त्यांनी त्वरीत खाली दिलेल्या पत्त्यावर संपर्क साधावा. असे या नोटीसीमध्ये म्हटले आहे.