संसदेच्या अ‍ॅनेक्सी बिल्डिंगमध्ये आग लागली, अग्निशमनच्या 4 गाड्या घटनास्थळी

नवी दिल्ली : वृत्त संस्था – नवी दिल्ली येथील संसद भवनाच्या अ‍ॅनेक्सी बिल्डिंगमध्ये आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या महितीनुसार, अ‍ॅनेक्सी बिल्डिंगच्या सहाव्या मजल्यावर आग लागली आहे.

शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे सांगितले जात आहे. सध्या अग्निशमन दलाच्या चार गाड्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. अजून वित्त आणि जिवितहानी बाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही.