पुणे महापालिकेतील विधीसमीती अध्यक्ष, उपाध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – विधी समिती सारख्या महत्वाची समिती मिटींगला मागील सहा महिन्यात दोन वेळा अध्यक्ष व उपाध्यक्ष व सत्ताधारी सदस्य सतत गैरहजर रहात असतील तर अशा नगरसेवकांना त्या पदावर पक्ष नेते का ठेवत आहेत ? असा प्रश्न राष्ट्रवादीचे नगरसेवक योगेश ससाणे यांनी उपस्थित केला.

प्रत्येक वेळी अधिकारी व उपस्थित सदस्य यांचा वेळ फुकट वाया जात असतो. आपण स्वत: आजपर्यंत दोन वेळी अध्यक्ष म्हणून कामकाज केले आहे. एवढ्या बेजबाबदार पदाधिकारीनी त्यांना वेळ व गांभीर्य नसेल तर राजिनामा द्यावा, अशी मागणी महापौर मुक्ता टिळक यांच्याकडे ससाणे यांनी पत्राद्वारे केली आहे.

पुणे महानगरपालिकेत भाजपचे 100 नगरसवेक आहेत. जनतेने नगरसेवकांना निवडून दिले आहे मात्र, त्यांना कर्तव्याची जान नाही. ज्या नगरसेवकांना कर्तव्याची जान नाही त्यांना पदमुक्त करावे, अशी मागणी ससाणे यांनी पत्राद्वारे केली आहे. एका कर्तव्य दक्ष प्रशासकीय अधिकारी कबाडे यांची पदोन्नतीचा ठराव गेली दोन महिने प्रलंबित होता, तो ससाणे यांच्या अध्यक्षतेखालील सभेने मंजुर करुन घेतला आहे.

Visit : Policenama.com 

Loading...
You might also like