महाराष्ट्रात बनलं नाही सरकार पण एका रात्रीत बदललं ‘या’ 4 गावाचं ‘नशिब’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – महाराष्ट्रात भलेही सरकार स्थापन झाले नाही, मात्र महाराष्ट्राच्या आमदारांमुळे राजस्थानच्या जयपूरमधील चार गावांची परिस्थिती मात्र सुधारली. महाराष्ट्रातील 44 आमदार हे जयपूरपासून 20 किलोमीटर आत असलेल्या एका रिसॉर्टमध्ये थांबले होते. मात्र त्या रिसॉर्टकडे जाणारा मार्ग हा जयपूरमधील या चार गावांमधून जात होता.

महाराष्ट्र में नहीं बनी सरकार पर रातों-रात बदल गई 4 गांवों की किस्मत

या आमदारांच्या भेटीसाठी मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि त्यांच्या सरकारमधील मंत्र्यांना सतत जावे लागत असे, मात्र या रस्त्यांच्या दुर्दशेमुळे त्यांना त्रास जाणवू लागल्याने रात्रीत या रस्त्यांचा कायापालट झाला. त्यामुळे सरकारची इच्छा असेल तर काय होऊ शकत नाही.

महाराष्ट्र में नहीं बनी सरकार पर रातों-रात बदल गई 4 गांवों की किस्मत

अवघ्या 5 दिवसांच्या आतमध्ये या रस्त्यांसाठी बजेट मंजूर करून हे रस्ते देखील तयार करण्यात आले. त्याचबरोबर रस्त्यावरील खांबावर एलईडी लाईट्स देखील लावण्यात आल्या. त्यामुळे या आमदारांच्या बहाण्याने का होईना पण या गावांमध्ये पक्के रस्ते तरी तयार झाले.

महाराष्ट्र में नहीं बनी सरकार पर रातों-रात बदल गई 4 गांवों की किस्मत

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, या गावांमध्ये त्यांना आजपर्यंत व्यवस्थित रस्ते पाहायला मिळाले नव्हते, मात्र या आमदारांच्या भेटीमुळे का होईना आम्हाला ते पाहायला मिळाले.

महाराष्ट्र में नहीं बनी सरकार पर रातों-रात बदल गई 4 गांवों की किस्मत

दरम्यान, काही जणांनी दिलेल्या माहितीनुसार, या गावातील नागरिक इतके त्रस्त झाले होते कि, त्यांनी शेवटी या भागातील आमदाराला चपलांचा हार घालण्याची देखील तयारी सुरु केली होती.

महाराष्ट्र में नहीं बनी सरकार पर रातों-रात बदल गई 4 गांवों की किस्मत

Visit : Policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like