शरद पवारांची अवस्था ‘शोले’तील ‘जेलर’सारखी (व्हिडिओ)

उल्हासनगर : पोलीसनामा ऑनलाईन – शरद पवारांची अवस्था आधे इधर जाओ, आधे उधर जाओ, बाकी मेरे पिछे आओ, अशी झाली असल्याचे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. उल्हासनगर मतदारसंघात महायुतीचे उमेदवार कुमार आयलानी यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते. यावेळी भाजपच्या जाहीरनाम्याचं प्रकाशनही करण्यात आलं. तसेच येत्या काळात उल्हासनगरात मेट्रो आणून मेट्रो स्टेशनला सिंधूनगर नाव देण्याची घोषणा त्यांनी यावेळी केली.

विरोधकांवर टीका करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की , ‘यंदाच्या निवडणुकीत कुणी प्रतिस्पर्धीच नसल्यानं निवडणुकीला मजा येत नाहीये. एकीकडे राहुल गांधी बँकॉकला निघून गेलेत, तर शरद पवारांची अवस्था आधे इधर जाओ, आधे उधर जाओ, बाकी मेरे पिछे आओ, अशी झाली असून त्यांच्यासोबत कुणीच नाही.’

सभेत विरोधकांनी जाहिरनाम्यावर टीका करताना फडणवीस म्हणाले की , ‘विरोधकांनी जाहिरनाम्यात इतकी आश्वासनं दिली आहेत, की ते पाहून महाराष्ट्रात प्रत्येकाला ताजमहाल बांधून देऊ, महाराष्ट्रात प्रत्येकाला चंद्रावर नेऊ, अशीही आश्वासनं उद्या देतील. ‘

उल्हासनगरमधून कलानी कुटुंबीयांना मात्र डावलत भाजपने कुमार आयलानी यांना उमेदवारी दिली आहे. यापूर्वी उल्हासनगर महापालिकेच्या निवडणुकांमध्ये कलानी परिवारामुळे भाजपाला पालिकेत सत्ता स्थापन करता आली होती. तसंच शिवसेनेला पालिकेतील सत्तेपासून वंचित ठेवण्यातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. चार वेळा आमदार राहिलेल्या पप्पू कलानी यांचा 2009 मध्ये कुमार आयलानी यांनी पराभव केला होता.

Visit : policenama.com

Loading...
You might also like